Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या समवेत आयुक्त यांनी केला … महापौरांच्या प्रभागाचा पाहणी दौरा…

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. १५ सप्टेंबर २०२१) : जुनी सांगवी परिसरातील विकासकामे, रस्ता रुंदीची कामे तसेच अतिक्रमणाबाबत अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी अधिका-यांस दिले. जुनी सांगवी परिसरातील चालू असलेली तसेच प्रस्तावीत विकास कामांची महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या समवेत आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली त्यावेळी आयुक्तांनी अधिका-यांना आदेश दिले.

यावेळी ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे, सहशहर अभियंता अशोक भालकर, श्रीकांत सवणे, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, अनिल राउत, प्रमोद ओंभासे, सुनिल वाघुंडे आदी उपस्थित होते.

Google Ad

आयुक्त राजेश पाटील यांनी प्रस्तावित मधूबन सोसायटी १२ मीटर डी.पी.रस्ता, मुळा रोड १८ मीटर रस्ता, खेळाचे मैदान, सांस्कृतीक केंद्र, सांगवी बोपोडी पुल, पी.डब्ल्यु.डी. मैदानाशेजारील  रस्त्यालगत झालेले अतिक्रमण आणि विकासकामाबाबत अधिका-यांसह पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच परिसरातील नागरी समस्यांबाबत माहिती घेतली.

महापौर माई ढोरे, ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे यांनी वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते,  अतिक्रमण समस्या आयुक्त पाटील यांना सांगितल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!