Google Ad
Uncategorized

महाराष्ट्रात अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी सोनल जाधव च्या मुलाचा अपघात, मृत्यूशी झुंझ सुरू… ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांचे मदतीचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : महाराष्ट्रात अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी सोनल जाधव च्या मुलाचा अपघात … ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांचे मदतीचे आवाहन आपल्या भाविकांना केले आहे.

एका लहान लेकराला कुमार नमन शेटे याला आपल्या मदतीमुळे जिवदान मिळेल, प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय गरिबीत कष्टाने आणि स्वाभिमानाने जगून महाराष्ट्रात अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी सोनल जाधव विवाह करून शेटे परिवाराची सून झाली तिचा मुलगा नमन विवेक शेटे हा उत्कृष्ट आई च्या संस्कारात वाढत असताना बालपणी भाषण करू लागला, खूप अभ्यास करू लागला आणि भविष्यात महाराष्ट्राला एक चांगला नैतिक अधिष्ठान असलेला वक्ता मिळेल या आनंदात आम्ही सर्व असताना कुमार नमन शालेय सुट्टी मध्ये ग्रामीण भागात राहत असल्याने खेळता खेळता बैलगाडीच्या मध्ये आला आणि बैलगाडी त्याच्या अंगावरून गेली या दरम्यान तो प्रचंड गंभीर जखमी झाला आहे.

Google Ad

हृदयाची जागा बदलली आहे तर फुफ्फुसांना इजा झाली आहे, सध्या तो पुणे येथिल केईएम रुग्णालयात अतीदक्षता विभागात उपचार घेत आहे. सुरुवातीचा मोठा उपचार करताना नमन ची आई सोनल व वडील विवेक यांनी सर्व पैसे आणि काही प्रॉपर्टी जवळचे आपल्या लेकराला वाचवण्यासाठी खर्च केले आहेत आणि त्याला अजून उपचार मिळाले तर नमन नक्की वाचेल ही अपेक्षा आहे परंतु आज नमन च्या आई बाबांची परिस्थिती राहिली नाही त्याला उपचार करून वाचवण्याची म्हणून मी डॉ. पंकज महाराज गावडे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर तुम्हां सर्वांना विनंती करतो की आज पर्यंत तुम्ही सर्व जण माझ्या आवाहनाला साथ देत जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या मंदिरासाठी मदत करत आहात आणि करणार ही आहात आणि मी ही जगद्गुरूंच्या मंदिरा शिवाय कशाला ही मदत मागत नाही अगदी स्वतः हा साठी ही नाही परंतु आज ६ जून २०२३ रोजी प्रवचन करण्यासाठी सकाळी ६ वाजता घर सोडले आणि सोनल चा कॉल आला ती खूप व्याकूळ आणि हतबल झाली होती तिचा आवाज ऐकून मी पुरता हादरून गेलो आहे.

कारण मी तिचा प्रवास पाहिला आहे अत्यंत विदारक परिस्थिती मध्ये ती झुंजली आहे कधी ही हरली नाही परंतु आज एक आई हतबल झालेली पाहून माझे डोळे भरून आले कारण जो नमन उद्या एक महान वक्ता होणार याची सर्वांना खात्री होती तो आज मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्याच्या उपचाराला आई वडिलांकडे पैसे नाहीत. मी तुम्हांस अंतकरणापासून विनंती करतो आहे की एक सुसंस्कृत, बुद्धिमान व अत्यंत विनम्र असलेल्या नमन ला वाचवण्यासाठी त्याच्या उपचारासाठी मदत करा. मदत करण्यासाठी मी त्याच्या आई चे बँक डिटेल्स पाठवत आहे. हात जोडून विनंती चला आपण नमन ला जगवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूयात.

Ac name – Sonal Vivek Shete
Ac No – 31498623596
Bank – SBI Junnar Branch
IFC code- SBIN0006443
http://Gpay/Phone pay No-9860370439*

*डॉ. पंकज महाराज गावडे*
*श्री क्षेत्र भंडारा डोंगर*
*चला बदलूया राष्ट्र घडवूया..!*
*हिरा पंकज सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!