शहरातील निगडी येथील अभिश्री राजपूत यांची श्रीलंका येथे २६ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या युथ एशियन योगा गेम्ससाठी “भारतीय संघाची कोच” म्हणून निवड करण्यात आली आहे तिचा महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
सत्काराच्या वेळी माजी नगरसदस्य प्रा. उत्तम केंदळे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय एशियन गेम्सचे सेक्रेटरी सुरेश गांधी यांनी अभिश्री राजपूत यांची निवड केली असून हा संघ २४ ऑगस्ट रोजी एशियन गेम्ससाठी रवाना होईल. जगताप यांनी या संघाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अभिश्री यांचे उत्तम कामगिरीसाठी कौतुकही केले. अभिश्री या कोया फिटनेस अकॅडमीच्या संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संघटनेतून पिंपरी चिंचवड मधील १३ मुलींची या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामध्ये अनुष्का रानडे, आर्या जाधव, कवी गायकवाड, रुजल जोशी, आरोही राऊत, मनवा पंडित, मुक्ता जाधव, त्रिशा बंसल, ट्विषा सुहानी, सई निंबाळकर, प्रणिका गावंडे, जानवी मुळूक, अनविका वायकर या सर्वांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…