Pune : कोविड रुग्णांच्या चेहऱ्यावर अभाळाएव्हडा आनंद … ऑक्सिजन लावलेल्या कोविड रुग्णांनी टाळ्यांच्या लयीत धरला ताल !!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२० मे) : तु मेरी जोहरा जबी, और इस दिल में, चोरीचा मामला या हिट गाण्यांसोबत शिर्डी वाले साईबाबा अश्या भक्तीगीतांनी प्रेक्षक टाळ्या वाजवत दाद देत होते, हा कार्यक्रम कुठे सार्वजनिक ठिकाणी नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये लोकगायक अमर पुणेकर, विनोद धिवार, कल्पना जगताप, विजय साळवी, प्रकाश दळवी यांनी सादर करून रुग्णांना त्यावर डोलायला लावले.

छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचे संचालक उमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी रंगला! हॉस्पिटलचे संचालक शांताराम खलसे, सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे, शिवसेनेचे आनंद गोयल, हॉस्पिटल व्यवस्थापक गिरीश घाग, अर्चना प्रधान, चंद्रकांत सरवदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम आळतेकर, रुग्ण हक्क परिषदेचे अपर्णा साठे, विकास साठ्ये यांनी या सदाबहार कार्यक्रमाला उपस्थित राहून कोविड रुग्णांना या लढाईत एकटे नसल्याचे सांगितले.

उमेश चव्हाण म्हणाले की, इतर आजाराशी लढताना कुटुंबीय, आप्तेष्ट, मुले – नातवंडे सोबत असतात मात्र कोविड रुग्णाला कोणालाही भेटता येत नसल्याने एकटेपणाची जाणीव होते. त्यामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या तपासण्या, सातत्याने रुग्णाला दिले जाणारे उपचार यामुळे नैराश्य आल्यासारखे वाटते यातून बाहेर पडण्यासाठी आयोजित केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम यशस्वी ठरला.

गायक अमर पुणेकर म्हणाले की, अनेक विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले, मात्र इथे संगीत सेवा करताना लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हास्य पाहून खूप समाधान वाटले. ऑक्सिजन लावून पडून राहिलेला रूग्ण जेव्हा गीतांचे बोल ऐकून उठून बसला गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत ताल धरू लागला तेव्हा त्यांची ‘इम्युनिटी पॉवर’ खऱ्या अर्थाने वाढली असल्याचे जाणवले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

36 mins ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

8 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago