Google Ad
Editor Choice

‘अब की बार सौ पार’ … पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा’ … भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ नोव्हेंबर) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे भाजपने ‘अब की बार सौ पार’ चा नारा दिला आहे, आणि लढा देण्याकरिता तशा हालचालींना वेग आलेला ही दिसत आहे, याच पार्श्वभूमीवर भाजप चे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष घातल्याने विरोधकही त्याची चर्चा करत आहेत.

नुकतीच पिंपरी-चिंचवड भाजपा चिंचवड किवळे मंडलाची आढावा बैठक चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर पांडुरंग जगताप यांच्या उपस्थितीत आज वाल्हेकरवाडी येथे संपन्न झाली. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, बुथ सक्षमीकरण, प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची नेमणूक यावर चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महानगरपालिकेत पाच वर्षे सत्तेत राहून केलेले काम, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन देखील केले.

Google Ad

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेवजी ढाके, माजी नगरसेवक श्री.संदिपजी कस्पटे, श्री.बाळासाहेब ओव्हाळ, श्री.सुरेशजी भोईर, श्री.सचिनजी चिंचवडे, श्री.मोरेश्वरजी शेडगे, श्री.सिध्देश्वरजी बारणे, श्री.अभिषेकजी बारणे,श्री.तानाजी बारणे, सौ.आरतीताई चोंधे, सौ.मनिषाताई पवार
सौ.संगिताताई भोंडवे, सौ.भारतीताई विनोदे
स्विकृत सदस्य श्री.विभीषण चौधरी, श्री.विठ्ठल भोईर, श्री.संदीप गाडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री.संकेत चोंधे, भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा शहर अध्यक्षा सौ.उज्वलाताई गावडे, भाजपा शहर उपाध्यक्ष श्री.काळुराम बारणे, श्री.शेखरजी चिचंवडे, श्री.मधुकर बच्चे, चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री.नरेंद्र माने, श्री.आदेश नवले, श्री.मनोज तोरडमल, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष श्री. राजेन्द्र चिंचवडे, भाजपा सांस्कृतिक आघाडी शहराध्यक्ष श्री.धनंजय शाळीग्राम, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष श्री.योगेश चिंचवडे , चिंचवड किवळे मंडल महीला मोर्चा अध्यक्ष सौ. पल्लवीताई वाल्हेकर, चिंचवड किवळे मंडल युवा मोर्चा अध्यक्ष श्री.सनी बारणे, चिचंवड किवळे ओबीसी सेल अध्यक्ष श्री.प्रशांत आगज्ञान, चिंचवड किवळे मंडल सरचिटणीस श्री.रविन्द्र प्रभुणे, प्रदीप पटेल, चिंचवड किवळे मंडलातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!