महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ सप्टेंबर) : उमरगा तालुक्यातील एका तरुणाने मराठा आरक्षण मिळावं यासाठी तलावात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. जालन्यात सुरु असलेल्या मराठा समाजाला आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणानंतरची धाराशिव जिल्ह्यातील युवकाने घेतलेली मोठी बातमी समोर आली आहे. माडज (ता. उमरगा) येथे बुधवारी (दि ०६) सांयकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात आंदोलनाची धग सुरु असताना माडज (ता. उमरगा) येथील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या किसन माने या (३० वर्षीय) तरूणाने जीवन संपवत मोठे पाऊल उचलले आहे. ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशी घोषणा देत त्याने गावातील शिवकालीन तलावात उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेची माहिती समजताच गावातील लोक तलावाभोवती जमले. प्रत्यक्षदर्शनी व्यंकट गाडे यांनी सांगितले की, किसन हा नेहमी मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करायचा. बुधवारी (दि. ६) दुपारी चारच्या सुमारास किसनने मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत अगदी कांही क्षणात तलावात उडी घेतली. गाडे यांनी बुडालेल्या तरुणाला तलावात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडे यांचा प्रयत्न अपयशी ठरला.
तरुणांची घोषणाबाजी!
या घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक डी बी पारेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक एन आर गायकवाड आदी पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, रतन काजळे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिली. उपसरपंच बलभीम काळे, संतोष पाटील, नरेंद्र माने, मोनेश्वर पांचाळ, शरद माने, विजयकुमार माने, दिनकर पाटील, बळीराम मारेकर, अज्ञान पाटील, अप्पाराव गायकवाड , मधुकर माने, बालाजी काळे, काकासाहेब गायकवाड, किसन पाटिल, विजय बाचणे, मोहन माने आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दरम्यान आजू बाजूच्या गावातील तरूण माडज गावात मोठ्या संख्येने दाखल झाले असून गावात मराठा आरक्षणासाठी तरुणांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. रात्री उशीरापर्यंत जमाव असला तरी गावात शांतता होती.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…