Google Ad
Editor Choice

Pune : पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं … चालकासह महिला जखमी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जुलै) : मुसळधार पावसात शहरातील केईएम रुग्णालयाजवळ मोठे झाड रिक्षावर कोसळले. यात एका रिक्षा चालक व महिला जखमी झाली आहे. तर इतर ठिकाणी तीन झाडे कोसळली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच पाच कार, एक रिक्षा व सायकलचे नुकसान झाले.

या घटनेत रिक्षाचालक मियालाल जमादार (वय 80) आणि पादचारी संगीता नेमसे (वय 34) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. शहरात गेल्या दोन दिवसात अति मुसळधार पाऊस सुरू आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. पाऊस व हलक्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाड पडीच्या घटना घडत आहेत.

Google Ad

यादरम्यान केईएम रुग्णालय परिसरात एक मोठे झाड अचानक कोसळले. झाड रिक्षावर व इतर वाहनांवर कोसळले गेले. यावेळी पादचारी महिला संगीता या जखमी झाल्या. तर रिक्षा चालक रिक्षात बसले असल्याने ते देखील जखमी झाले आहेत.

तसेच 5 कार, एक रिक्षा आणि एका सायकलचे नुकसान झाले आहे. रिक्षात बसलेले जमादार अडकले होते. नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच रिक्षा चालक जमादार यांना सुखरूप बाहेर काढले. तर झाडाच्या फांद्या कापून झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली होती. यासोबतच मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी कर्वेनगर(Karvenagar) परिसर, विठ्ठल मंदिर तसेच एरंडवणे भागातील पटवर्धन बाग भागात झाडे कोसळल्याची घटना घडल्या आहेत.

अग्निशमन दलाचे आधिकारी प्रकाश गोरे, तांडेल राजाराम केदारी, जवान चंद्रकांत आनंददास, मंगेश मिळवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शहरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सुदैवाने वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. काही विसर्ग सोडला गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्र परिसरात अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!