Google Ad
Editor Choice Education

पिंपरी-चिंचवड आर टी ओ कार्यलयातून एकूण २२५ जणांनी घेतला घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवान्याच्या लाभ!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यलयातून एकूण 225 जणांनी घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवानाचा लाभ घेतला आहे. यामुळे नागरिकांच्या आरटीओ मधील चकरा वाचल्या असून तसेच श्रम,वेळ व पैशाची देखील बचत होणार आहे. राज्यभरात या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड वेबसाईटवर अपलोड करावे लागत आहे.

एका परवान्यासाठी दोनशे रुपये शुल्क आहे त्याचबरोबर 15 गुणांची परीक्षाही द्यावी लागत आहे. यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक ला लिंक असणे गरजेचे आहे व पत्त्याचा पुरावा व ओळखपत्र अत्यावश्यक आहे. तर, वयोमर्यादा ही 18 वर्षाची आहे. सर्वात सोप्या पद्धतीने हे लायसन्स उपलब्ध होत आहे. ऑनलाइन नमुना चाचणी सराव देखील यामध्ये देण्यात आलेला आहे.

Google Ad

आरटीओ कार्यालयाप्रमाणे ऑनलाईन परवान्यांसाठी कुठलेही बंधन राहणार नाही. अपॉइंटमेंटची देखील आवश्यकता नसल्यामुळे नागरिक आपल्या वेळेप्रमाणे कधीही या सेवेचा घरबसल्या लाभ घेऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चांगली सुविधा असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

61 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!