महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवड कडिल अधिकारी व अंमलदार हे मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे व मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील आरोपी राहुल दगडु शिंदे वय २० वर्ष रा. बि. न १०, रूम नं १०३ श्रीराम सोसायटी ओटास्किम निगडी पुणे याचे मागे सुमारे ६ महिण्या पासुन होते. त्यास मोठ्या शिताफिने पकडुन सांगवी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १६३ / २०२३ भा. दं. वि. कलम ३७९ या गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याचेकडे अटक मुदतीत कसून तपास करुन त्याने पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागातुन सुमारे १ वर्षापासुन चोरुन आणलेल्या एकुण किं रुपये ५,१०,०००/- च्या ११ मोटार सायकली हस्तगत करुन एकुण ०७ गुन्हे उघडसकिस आणले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-४ कडिल वाहनचोरी करणारे अभिलेखारील गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना खात्रीशिर बातमी मिळाली कि रेकॉर्डवरील वाहन चोरीचे गुन्हे करणारा इसम नामे राहुल दगडु शिंदे रा. वि. न १०, रुम नं १०३, श्रीराम सोसायटी ओटास्किम निगडी पुणे हा बऱ्याच दिवसांपासुन त्याचे मुळ | पत्त्यावर राहणेस नसुन त्याने पिंपरी चिंचवड हद्दितील व पुणे जिल्ह्यातील इतर भागांतील मोटार सायकली चोरुन त्याचे ओळखीचे लोकांना विकल्या आहेत, वगैरे बातमी मिळाल्यावरुन त्याचेबाबत इतर गोपनिय बातमिदारांना कळवुन त्याचा शोध घेत होतो.
दिनांक ११/०५/२०२३ रोजी सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उप निरीक्षक गणेश रायकर, सपोफो जाधव, पो.हवा, तुषार शेटे, मोहम्मदगौस रफिक नदाफ पोना / वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो गुन्हे शाखा युनिट ४ पिपरी चिंचवड यांच्या आदेशान्वये राहुल दगडु शिंदे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन त्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दितुन तसेच पुणे जिल्ह्याचे इतर भागातुन चोरलेल्या वेगवेगळ्या मोटारसायकल / मोपेड दुचाकी ह्या वेगवेगळ्या इसमांना विकल्याचे केले तपासामध्ये निष्पन्न करुन आरोपी नामे राहुल दगडु शिंदे वय २० वर्ष रा. बि. न १०, रुम नं १०३, श्रीराम सोसायटी ओटास्किम निगडी पुणे याने विकलेल्या ०७, लपवुन ठेवलेल्या ०३ अशा मोटारसायकल / मोपेड जप्त करण्यात आल्या व रांजणगाव पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३९५ या गुन्ह्यात जप्त असलेली मोटारसायकल बाबतचा गुन्हा उघडकिस आणण्यात आला.
सदर गुन्हयातील आरोपी याचेकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल / मोपेड पैकी ०४ मोटारसायकल / मोपेड मालकांबाबत माहिती मिळुन येत नाही, सुमारे ०१ वर्षाच्या कालावधीमध्ये वाहनचोरी झालेल्या नागरीकांनी गुन्हे शाखा युनिट-४ येथे जप्त ०४ वाहने आपली आहेत अगर कसे याबाबत संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…