महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : बेंगलोर महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भूमकर पुलाजवळ खोबरे तेलाने भरलेला टँकर उलटला. ही घटना संध्याकाळी घडली आहे. अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.परंतु रस्त्यावर खोबरे तेल पसरल्याने महामार्ग मोठ्या प्रमाणावर निसरडा झाल्याने, महामार्गावरील वाहतूक मंदावली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
टँकर कोईमतूर तामिळनाडू येथून २४००० हजार लिटर खोबरे तेल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना, नऱ्हे येथील भुमकर पुलावर गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकर चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच सर्वत्र तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला .टँकरमधून खोबरेल तेल पडल्याने मोठ्या प्रमाणावर तेलाचे पाट वाहू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून, माती टाकून निसरडा झालेला मार्ग पूर्ववत केला. सुदैवाने अपघातात जिवित हानी झाली नाही. मात्र रस्त्यावर तेल वाहून मार्ग निसरडा झाल्याने बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कमालीची संथ झाली.
सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ पोलीस, वाहतूक पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य राबवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र रस्त्यावर तेल वाहूम वाहतूक संथ झाल्याने बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा मारा करून मार्ग स्वच्छ करण्यात आला. त्यावर माती टाकल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…