Google Ad
Uncategorized

राष्ट्रवादीच्या फुटीर गटाने शरद पवारांची भेट घेऊन केली मनधरणी … त्यावर शरद पवार म्हणाले,…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जुलै) : जुलै महिन्यांतील रविवारचे दिवस जरा चांगलेच चर्चेत राहत आहेत. 2 जुलै रोजी घडलेल्या सत्तानाट्यांनतर आज 17 जुलै रोजी रविवारच राष्ट्रवादीच्या फुटीर गटाने शरद पवारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली.

मात्र, या भेटीनंतर तब्बल दोन तासानंतर शरद पवारांनी आपली भूमिक स्पष्ट केली. आपल्याला भाजपसोबत जायाचे नसून, पुरोगामी भूमिका घेऊन पुढे जाऊ आणि संघर्ष करु असे राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते म्हणाले.

Google Ad

अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीमधून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी बाहेर आल्यानंतर सांगितले की, आम्ही शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना एकत्रित काम करण्याबाबत विनंती केली. मात्र शरद पवारांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे पटेलांनी स्पष्ट केले.

भेट घेऊन परतलेल्या अजित पवार गटांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली होती. फुटीर गट भेटून गेल्यानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार बोलतांना म्हणाले की, पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मला भाजपसोबत जायचे नसून आपल्याला संघर्ष करायरचा आहे. असे म्हणून पवारांनी अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!