महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३: तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध सेवा व सुविधेबाबत माहिती देण्यासाठी व त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स.नं. १०४/१०५, विश्रातवाडी येथे स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला आहे.
जिल्हास्तरावरच तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारीचे निवारण करणे, यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून तृतीयपंथीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतनयोजना, तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदानकार्ड व आधारकार्ड काढण्यासाठी मदत करणे, केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे, शासनाने व समाज कल्याण आयुक्तालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाबांबत माहिती देण्यासाठी हा कक्ष सुरु करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी या कक्षाशी प्रत्यक्ष अथवा ०२०-२९७०६६११ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…