महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ एप्रिल) : देवांग कोष्टी समाजाच्या म्हणजेच विणकर बांधवांचे बरेचसे प्रश्न/मागण्या शासन दरबारी मांडणे बाबत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व विणकर बंधु आणि महाराष्ट्रातील सर्वच विणकर समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन याविषयी शासन दरबारी निवेदन देणे फार गरजेचे आहे, या करिता “देवांग कोष्टी समाज, पुणे” यांनी एक पाऊल पुढे टाकीत पुणे येथे रविवार दि. ०९/०४/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा, श्री चौंडेश्वरी मंदिर देवांग होस्टेल, पिंपळे निलख, पुणे या ठिकाणी सर्व संघटना व पदाधिकारी यांचे भव्य चर्चासत्र आयोजित केले होते.
सदर चर्चा सत्रा मध्ये अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, यामध्ये विणकरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, प्रलंबित आरक्षण करिता ठोस अंबलबजावणी करून घेणे, विणकर समाजाची एकजूट व ताकद सरकारला दाखवणे, जेणे करून कामे सुरळीत लागतील, वस्त्रौद्योग धंद्याविषयी प्रलंबित प्रश्न निकालात काढणे, वीज बिल अनुदान मंजूर करणे, पश्चिम महाराष्ट्रात नवीन होतकरू मुलांकरिता उद्योग धंदे करिता सरकारी अनुदान मिळवणे, वस्त्रौद्योग करिता शासन कडून कमी व्याज दराने भांडवली पत पुरवठा मिळवणे.
असे अनेक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून सर्व संघटना व पदाधिकारी यांच्या एक मताने एकच भरीव असे निवेदन सादर करण्याचे यावेळी ठरले, तसेच सर्व महाराष्ट्रातील बांधवांनी एकत्र पणे चर्चा करून निर्णय घेणे करिता येणे फार आवश्यक आहे. सदरचे निवेदन आपण सर्वांनी मिळून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, वस्त्रौद्योग मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री, पालक मंत्री वित्त मंत्री तसेच सर्व शासकीय अधिकारी यांना देणार आहोत व पाठपुरावा करणार आहोत. असे अध्यक्षसुरेश तावरे म्हणाले.
तरी या महत्त्वाच्या चर्चा सत्रा करिता, महाराष्ट्रातील काना कोपर्यातील सर्वच विणकर संघटना व समाज सुधारणे साठी आहोरात्र कष्ट करणाऱ्या बांधवांनी सहभागी होणार आहेत. तसेच आपली अमूल्य अशी मते मांडून पुढची पावले कशी टाकता येतील या वर सविस्तर चर्चा करणार आहेत. असे बऱ्याच वक्त्यांनी बोलताना सांगितले.
आपण आपले प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनींना सहभाग घेण्याची विनंती करीत आहोत, तसेच येणाऱ्या सर्व उपस्थितान करिता स्नेह भोजनाची व्यवस्था केली आहे.
यावेळी अध्यक्ष भारतीय कोष्टी समाज अरुण वरुडे,
अध्यक्ष महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ अंकुश उकार्डे, अध्यक्ष कोष्टी समाज इचलकरंजी विश्वनाथ मुसळे , अध्यक्ष चौडेश्वरी सुत गिरणी संजय दादा कांबळे, पंडितरव इदाते, विजयाताई वाघ, अरविंद तापोळे, उत्तमराव म्हेत्रे, भगवानराव गोडसे, सुनील ढगे, अशोक भुते, दत्तात्रय ढगे उपस्थित होते
आजच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरेश तावरे अध्यक्ष तसेच देवांग कोष्टी समाज, पुणे यांनी केले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…