Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मेट्रो, स्मार्ट सिटी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या उपस्थितीत झाली आढावा बैठक … शहरातील या विविध प्रश्नांवर वेधले लक्ष!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मेट्रो यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार मेट्रोने फुटपाथ व दुभाजकांचे सुशोभिकरण, रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे तातडीने पूर्ण करून देण्याच्या सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या.
मेट्रो, स्मार्ट सिटी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगररचना उपसंचालक प्र.ग. नाळे, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, उप आयुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे, अतुल गाडगीळ आदी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-पुणे मेट्रोच्या कामाच्या कामाच्या सद्य स्थितीबाबत माहिती घेतली. पुणे मेट्रोचे पिंपरी-पुणे मेट्रो नामकरण करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका महासभेने ठराव मंजूर करून मेट्रोला दिला आहे त्याची कार्यवाही मेट्रो प्रशासनाने लवकर करावी असे आमदार जगताप यांनी सांगितले, पिंपरी-चिंचवड ते निगडी उन्नत मेट्रो प्रकल्पास अर्थसंकल्पीय तरतूद करणे, हिंजवडी-चाकण नवीन मेट्रो कॉरीडोरची प्रगती, पिंपरी-निगडी मेट्रो मार्गीका, पिंपरी-शिवाजीनगर मेट्रोचे पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील रस्त्यालगतचे सुशोभिकरण व मेट्रोच्या पोलवर वारकरी संप्रदायातील छायाचित्रे रेखाटणे, पिंपरी ते हॅरीस ब्रिज मेट्रो स्टेशनला थोर पुरुषांची नावे देणे आदी विषयांबाबत मेट्रोच्या अधिका-यांशी चर्चा करून त्यांना विविध सूचना दिल्या.

स्मार्ट सिटीच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीएमएलच्या पिंपळे गुरव बस स्थानका लगतच्या व्हिलेज प्लाझा आणि कमर्शियल सेंटरचे काम, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध आकर्षक ट्राफिक आयलंड, सिमेंटच्या रस्त्याची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना स्मार्ट सिटी प्रशासनाला दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत लष्कराच्या जमिनी लगत पिंपळ, चिंच, वड यांसारख्या देशी वृक्षांची लागवड करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत काटेपुरम चौक ते कृष्णा चौक, सृष्टी चौक ते पेट्रोल पंप या ११ मीटरच्या रस्त्यालगतचे फुटपाथ सुयोग्य पद्धतीने विकसित करणे आदींबाबत अधिका-यांशी चर्चा केली.

पिंपरी चिंचवड शहरातील मोरया गोसावी मंदिराला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा यासाठीचा अभिप्राय महानगरपलिकेने नगरप्रशासनाला पाठवावा, आमदार निधीच्या कामाकरिता स्वतंत्र डीपीडीसी सेल कार्यान्वित करावा, केंद्र तसेच राज्य सरकार यांच्याशी समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक करावी अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रशासनाला केल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!