Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथील महिला उद्योजकांना ‘पल्लवी जगताप’ यांच्या … ‘घे भरारी’ मेळाव्याच्या रूपाने कोरोनाच्या संकटात आशेचा किरण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महिला मेळाव्याचे उदघाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदघाटन प्रसंगी उद्योजक शंकर जगताप, नगरसेवक सागर अंघोळकर, नगरसेविका उषा मुंढे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, शिवाजी कदम, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, महालक्ष्मी महिला संस्थापिका नंदा आहिरे, किरण जगताप, ज्ञानेश्वर जगताप उपस्थित होते.

पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे महिला उद्योजिका मेळावा ‘घे भरारी’ आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या महामारीमुळे सध्याची परिस्थिती ही बिकट असली तरी सर्व स्त्रिया खंबीरपणे आपले कुटुंब सांभाळत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांचे व्यवसाय बंद पडले आहेत. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी महिला उद्योजकांना मदतीचा हात व प्रोत्साहन देण्यासाठी ‘घे भरारी’ या मेळाव्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, महालक्ष्मी महिला संस्थापिका नंदा आहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

Google Ad

परिसरातील महिलांनी विनामूल्य या संधीचा फायदा घेऊन आपला व्यवसायात भरारी मिळावी यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे दिसून आले. पन्नास ते पंचावन्न स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले होते. लोणचे, पापड, चटण्या, ज्वेलरी, कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, घरातील फिनेल, पूजेचे सामान, खाद्यपदार्थ व्हेज पुलाव, बिर्याणी, कॅनव्हॉस पेंटिंग कपडे, आकर्षक डिझाईनचे मनीपर्स, भाज्यांचे प्रकार आदी विक्रीचे साहित्य सामग्री तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.

हा महिला मेळावा गुरुवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा सोनकांबळे यांनी केले. यावेळी उपस्थित शैलजा येवले, अर्चना जाधव, कल्पना म्हणाले, संधीचा चौधरी, गौरी सावंत, ज्योती भोसले, सूचीता कोर्पे, सूनंदा गोडे, ज्योती गूंजाळ, पल्लवी परमार, भाग्यश्री कदम याप्रसंगी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या संधीचा फायदा घेत या मेळाव्यात महिलांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा मेळावा तीन दिवस असणार आहे. त्यामुळे अनेकांना या मेळाव्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. या मेळाव्यात प्रशासनाचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!