Google Ad
Editor Choice

आकुर्डी येथे माणुसकी पूर्णपणे संपली असल्याचे चित्र … नेपाळ धुमसत असताना एका नेपाळी तरुणाकडून मुक्या प्राण्याची तलवारीने निर्दयीपणे हत्या.!!!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप प्राण्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तो एक सुंदर हस्की कुत्रा होता. एका तरुणाने त्याला एका जाड दांड्याने आणि तलवारीने मारहाण केली असल्याचे सी सी टीव्ही फुटेज वरून समजत आहे, ज्यामुळे तो दांडाही तुटला, पण या तरुणांकडे तलवार आली कुठून हा प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत, स्थानिक नागरिकांकडून मिळलेल्या माहिती नुसार रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या तरुणाने अगोदर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर तलवार उगारून नंतर हे कृत्य केल्याचे समजते.

इतके होऊनही त्या तरुणाचा राग शांत झाला नाही. त्याने एका धारदार शस्त्राने हस्की कुत्र्यावर हल्ला केला  तो हल्ला इतका गंभीर होत की त्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. हस्कीने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो या क्रूरतेसमोर तो हरला, या नीच तरुण व्यक्तीने हस्कीच्या मृतदेहाला रस्त्यावर खूप दूरपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे सर्वत्र रक्ताचे डाग पसरले असल्याचे पाहायला मिळाले. शेवटी त्याने त्या मृतदेहाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले.

Google Ad

हे केवळ एका प्राण्याचा मृत्यू नाही, तर माणुसकीचाही मृत्यू आहे. ही घटना अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे.
प्राण्यांवर होणारी क्रूरता हा एक गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी या घटनेबद्दल जागरूकता वाढवून आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे म्हणजे अशा गुन्हेगारी ला कायम स्वरूपी आला बसेल. हा तरुण नेपाळी असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. निगडी पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या नेपाळी तरुणांचा शोध घेत आहेत.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!