Google Ad
Uncategorized

एकेकाळचे शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांची शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० नोव्हेंबर) : राष्ट्रवादी काँग्रेसमधी काही आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध जुगारुन शिंदे-फडणवीस सरकारमधी मंत्रीपदाची शपत घेतली. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देकील उभी फूट पडली.

राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीनंतर अजित पवार गटकाकडून थेट शरद पवार यांना लक्ष केलं गेलं. यानंतर दोन्ही गटामधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. अशातच आता अजित पवार गटातील मंत्री आणि एकेकाळचे शरद पवार यांचे विश्वासू असलेले दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे पुन्हा एकदा तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Google Ad

पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ही पूर्वनिजीच भेट होती. रयत शिक्षण संस्थेतील काही अडचणींबद्दल अध्यक्ष शरद पवारांबरोबर चर्चा झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील अन्य पदाधिकारीही होते. यावेळी अन्य कुठलीही चर्चा झाली नाही.

अशा भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याबद्दल प्रश्न विचाल्यावर ते म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. वसंत दादा शुगर, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, राज्य कारखाना आणि राष्ट्रीय कारखाना संघ या संस्थांवर मी काम करतो. येथे काम करताना नेहमीच शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आलो आहे. आज सहकारी संस्थांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती संदर्भात सरकाने केलेल्या उपोययोजनांबद्दल पवरांशी चर्चा केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!