Categories: Uncategorized

पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बससेवा, कसं राहणार वेळापत्रक ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी महामंडळाने पुण्यासाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून पुणे येथील शिवाजीनगर अर्थातच वाकडेवाडी येथील बस डेपो मधून शेगावसाठी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. खरंतर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यासह संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगाव मध्ये दाखल होत असतात.

यामध्ये पुण्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या उल्लेखनीय आहे. यामुळे या मार्गावर नवीन स्लीपर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती.दरम्यान नागरिकांची ही मागणी एसटी महामंडळाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून या मार्गावर स्लीपर बस सेवा सुरू झाली आहे.

मंगळवारी अर्थातच पाच डिसेंबर 2023 पासून ही नवीन स्लीपर बस सेवा सुरू झाली आहे. यामुळे पुण्याहून शेगाव नगरीला जाणाऱ्या भाविकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.

एस टी महामंडळाच्या या नवीन स्लीपर बस सेवेमुळे भाविकांना स्वस्तात आरामदायी प्रवास करता येणार आहे. दरम्यान आता आपण या नवीन स्लीपर बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहो

कस असणार नवीन वेळापत्रक ?

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुण्याहून शेगाव साठी दररोज ही स्लीपर बस सोडली जाणार आहे.

पुण्यातील शिवाजीनगर अर्थातच वाकडेवाडी येथील बस डेपो मधून दररोज रात्री नऊ वाजता ही स्लीपर बस शेगाव कडे रवाना होणार आहे. ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शेगाव येथील बस डेपोवर पोहोचणार आहे.किती तिकीट दर असणार

एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील स्लीपर बसने प्रवास करण्यासाठी 990 रुपये एवढे फुल तिकीट राहणार आहे. तसेच या प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सवलती देखील लागू केल्या जाणार आहेत.

म्हणजेच ज्या नागरिकांना सवलतीच्या दरात एस टी महामंडळाच्या इतर बसमधून प्रवास करता येत आहे त्या नागरिकांना या एसटीमधूनही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात काय दिले : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे

*महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:* *विकसित भारत-विकसित महाराष्ट्र.* महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१० मार्च : महाराष्ट्र…

13 hours ago

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाच्या वतीने 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या…

19 hours ago

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर महोत्सव

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च :  जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…

1 day ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…

2 days ago