Google Ad
Editor Choice

देवांग कोष्टी समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : देवांग कोष्टी समाज पुणे आजीव सदस्य व कोष्टी समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कै. सौ अलकाताई मुसळे यांचे स्मरणार्थ संगीत रजनी 2022 चे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर “जय जय महाराष्ट्र माझा” … या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवीन जुन्या मराठी, हिंदी गीते आणि लावणी गीते सादर करण्यात आली. या संगीत रजनीचे वैशिष्ट्य म्हणजे, यात समजातील बंधू भगिनींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठावर त्यांच्याच आवाजातील गीतांचा आविष्कार सादर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यास प्रेक्षकांनीही मनमुराद आनंद घेत दाद दिली.

Google Ad

कलाकार गायक मेघमाला पांडकर , अभिजीत खटावकर , चंद्रशेखर वरोडे , राजू भोरपे , डॉ . सुनील धिमते , प्रवीण होगाडे , स्वाती दंडि , आरती कवडे , पुनम फलके , वैभव मुसळे , शुभांगी टेके नृत्य श्रेया चोथे सूत्र संचलन सरोज बाबर , भाग्यश्री पांडकर यांनी केले, तर वाद्यवृंद विवेक परांजपे यांनी संगीताची साथ दिली.

या कार्यक्रमात समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाजबांधवाना तसेच उच्चपदस्थांना सन्मानीत करण्यात आले. तसेच समजाकरिता कायम आपले योगदान देणारे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दीर्घायुष्याकरीता प्रार्थना करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, अशोकराव मुसळे ( उद्योजक ) अरूणराव वरूडे ( अध्यक्ष अ.भा. कोष्टी मंडळ ), प्रकाश सातपुते ( अध्यक्ष म . को मंडळ ), उत्तमराव म्हेत्रे ( उयोजक ),किरण तारळेकर ( उद्योजक ) मा . प्रकाश शेठ कांबळे ( उद्योजक ) उपस्थित होते.संयोजन समितीचे सुरेश तावरे (अध्यक्ष), दत्तात्रय लिपारे, सुनिल ढगे, भगवान गोडसे, अशोक भुते, अभिजीत डोईफोडे, मंजुषा फारसे, मेघा पांडकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि नियोजन केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!