Categories: Editor Choice

‘वि आर देअर’ सोशल फौंडेशन आणि शांतिदुत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : पिंपरी चिंचवड वि आर देअर सोशल फौंडेशन आणि शांतिदुत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर रक्तदान शिबिर सावित्रीबाई फुले हॉल, ठाकरे ग्राउंड शेजारी, महादेव मंदिरासमोर, यमुनानगर निगडी येथे सम्पन्न झाले. सध्या आपल्या देशात व राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असताना अनेक वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्याचप्रमाणे रक्तसाठाही कमी होत आहे.

रक्ताची कमतरता अनेक रुग्णालयात तसेच वैद्यकीय संस्थेत होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर एक महत्वाचे सामाजिक उपक्रम ठरले. या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी आपले रक्तदान केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य श्री. विठ्ठल जाधव, पिंपरी चिंचवड लोकमतचे संपादक हनुमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी व धीरेंद्र सेंगर यांची प्रमुख उपस्थित होती.

वि आर देअर सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा वृषाली प्रवीण व शांतिदुत परिवार निगडीचे अध्यक्ष व वि आर देअर सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष राहुल रांजणे यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले. तसेच यावेळी लॉकडाऊन काळात गरजू नागरिकांना पोटभर जेवण मिळावे या दृष्टीकोनातून शहरातील १०० गरजू नागरिकांना जेवण देण्यात आले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago