गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना जामीन करुन देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी कोर्ट परिसरात सक्रिय … पिंपरीत सहा जणांच्या टोळीला अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून चक्क न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. पिंपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे. पुणे परिसरात आरोपींना जामीन करुन देण्यासाठी कोर्टाबाहेर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना जामीन करुन देण्यासाठी बनावट आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय कागदपत्रे तयार करणारी एक टोळी पिंपरी आणि पुणे कोर्ट परिसरात सक्रिय होती. या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे चक्क न्यायालयाची दिशाभूल केली.

पिंपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर कोर्ट पुणे आणि इतर कोर्टामध्ये गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत असत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात.

आरोपींनी न्यायालयाची दिशाभूल करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला आहे. बनावट नावाची बोगस कागदपत्रे पिंपरी न्यायालय येथे बोगस जामीनदार म्हणून हजर राहण्यासाठी आरोपींनी स्वतःजवळ बाळगली आहेत. हे प्रकरण पिंपरी परिसरात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक करून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago