Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पुण्यातील एका कर्नलने पत्नीवर झाडल्या गोळ्या … कर्नल पतीनंही केली आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० एप्रिल) : पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. बुधवारी घडलेल्या या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या एका लष्करातील सेवानिवृत्त कर्नलनं केली.

लष्करातून सेवानिवृत्त असणाऱ्या पुण्यातील एका कर्नलने  पत्नीवर गोळ्या झाडल्या. तिची हत्या केली. नंतर स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. कर्नलने पत्नीला ठार करुन आपणही का आत्महत्या केली, याची माहिती अजून स्पष्ट झाली नाही. घटनास्थळी मुंढवा पोलीस पोहचल्यानंतर घराचे दार तोडून पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर दोघेही मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान, निवृत्त कर्नलनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हे कळू शकलेलं नाही. पोलिसांकडून याप्रकरणी आता अधिक तपास केला जातो आहे.

Google Ad

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्नलचं नाव नारायणसिंग बोरा आहे. ते 75 वर्षांचे होते. तर त्यांच्या पत्नीचं नाव चंपा बोरा असून त्या 63 वर्षांच्या होत्या. घोरपडी येथील बी. टी. कवडे रोडजवळ असलेल्या सिटाडेल सोसायटीमध्ये ते राहत होते. नारायणसिंग बोरा यांनी पत्नीला मारुन आपण आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना घडून घडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, पुण्यात निवृत्त कर्नल बोरा आपल्या पत्नीसह पुण्यात राहत होते. त्यांना तीन मुलं असून त्यांचा एक मुलगा लष्करात आहे. तर दुसरा मुलगा मुंबईत राहतो. तर मुलगी दिल्लीत असून त्यांचा जावईही लष्करातच आहे. ही घटना घडण्याआधी त्यांचा एक मुलगा आपले वडील नारायणसिंग यांना फोन करत होता. मात्र त्यांच्या वडिलांनी आणि आईनेही फोन उचलला नाही नाही म्हणून त्यांनी आपल्या मित्रांना घरी जाऊन बघायला सांगितले.

त्यानंतर त्यांच्या मित्रांनी ते राहत असलेल्या सोसायटीत गेल्यानंतर घराचे दार बंद दिसले, बंद दार उघडत नसल्याने सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगण्यात आले. त्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी ही घटना मुंढवा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर दोघंही मृतावस्थेत आढळली. या घटनेची पुढील चौकशी मुंढवा पोलीस करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!