Categories: Editor Choice

‘देव तारी, त्याला कोण मारी’ … सांगवीतील पवना नदीच्या पुलावरून पडलेल्या नागरिकाला वेळेत काढल्याने वाचले प्राण !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑक्टोबर) : माणुसकी अजून जिवंत आहे, हे आज दिसून आले. आज सकाळी (दि.२७)  पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी दापोडी पवना नदीवरील जुन्या पुलाला कठडे किंवा सेफ्टी पाईप नसल्याने एका नागरिकाचा पुलावरून तोल गेला व तो नदीत पडला, असा फोन मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांना सकाळी ९ः३० वाजता आला.

या अगोदरही या पुलाची अनेकांनी तक्रार केली आहे, फोन आला त्यावेळी सावळे हे त्वरित त्या ठिकाणी पोहचले, त्यावेळी नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने सदर इसमाचा पायाचा तुकडाच झाला व हाताला खुप मार लागून खुपच गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यावेळेस त्याला उचलणे मुश्कील होते. अशा परिस्थितीत सावळे यांनी स्मशानभुतील कर्मचारी कार्यकर्त्यांच्या साह्याने स्मशानभुमीतील स्ट्रेचर आणून त्या इसमास नदीतून बाहेर काढले.

यावेळी राजू सावळे म्हणाले, ताबडतोब ॲब्युलन्स १०८ ला ९/१० वेळा फोन करावा लागला, त्यावेळी नेहमी प्रमाणे ॲब्युलन्स पाठवली असे उत्तर मिळत होते, पण अर्धातासाने अंबुलन्स आली, १०८ ची हि सेवा कुचकामी आहे, याची तक्रार केली, आणि नंतर ७ मिनटातच गाडी आली. तसेच सांगवी पोलीस स्टेशनचे सुनिल टोणपे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांना कळवले. त्यानीही त्वरित पोलीस मार्शल पाठवले. त्याच बरोबर ही व्यक्ती जळपासचे नागरीक आहे, अशी ओळखही पटली, सावळे यांनी कार्यकर्त्याला घरी पाठवून नातेवाईकांना बोलावले, त्यावेळी असे कळाले हे विनोद मोरे जयमाला नगरचे रहिवासी असून हे कॅालेजला लेक्चरर आहेत.

त्यांचा मुलगाही त्याठिकाणी आला व ससून हॅास्पिटला पुणे येथे ॲब्युलसने पाठवले यावेळी सर्व प्रथम येथिल स्थानिक विनोद चव्हाण प्रयदर्शनी नगर हे घटना स्थळी असल्याने यांच्या मदतीने ताबडतोब बाहेर काढले. तसेच जवळील सांगवी स्मशानभुमीतील ॲापरेटर,वाचमन यांना स्ट्रेचर घेऊन बोलावले रोहित स्वामी,सुनिल देशमुख,देवा माकर,महेश कदम,अजय मोरे यांच्या सहकार्याने सर्व शक्य झाले व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माणुसकीचे दर्शन घडले, अशा माणसांमुळे च माणुसकी अजून जिवंत आहे ,असे वाटते ...

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago