Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल याच्याविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१जुलै) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिलेला मंगलदास बांदल याच्याविरोधात लोणी काळभोर येथे पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंदुकीचा धाक दाखवून जमीन गहाणखत करून तब्बल पावणे सात कोटी रुपये परस्पर काढून घेतल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम सावळा मासाळकर या 74 वर्षीय व्यक्तीची हवेली तालुक्यात जमीन आहे. त्या जमिनीचे बळजबरीने गहाणखत करून संबंधित व्यक्तीला गाडीत डांबून आरोपींनी तब्बल 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल याच्यासह सचिन पलांडे, विकास भोंडवे, संदीप भोंडवे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 पासून हा प्रकार घडत असल्याचं फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Google Ad

बळजबरीने गहाणखत करून 6 कोटी 75 लाख रुपये परस्पर काढून घेतल्यानंतर आरोपींनी जमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचंही गंगाराम मासाळकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे ग्रामीण पोलिस या प्रकरणात आणखी तपास करत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

61 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!