Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी : जिममध्ये आला व्यायाम केला, पाणी पिताच …

महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम करताना ३७ वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे. व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू झाला आहे.. ही घटना चिंचवड गावातील नायट्रो जिममध्ये घडली आहे.जिममध्ये ते नेहमी प्रमाणे व्यायाम करत होते, याचदरम्यान त्यांना भोवळ आली, आणि ते जागेवरच कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना तेथून जवळच असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं,

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Google Ad

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून व्यायामासाठी या जिममध्ये येत होते.आजही ते नेहमी प्रमाणे या जीममध्ये व्यायामासाठी आले, त्यांनी व्यायाम केला, त्यानंतर ते एका ठिकाणी बसले, त्यांनी पाणी पिलं, त्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले, त्यानंतर जिममध्ये जे व्यायाम करण्यासाठी इतर जण आले होते, त्यांनी तातडीनं मिलिंद कुलकर्णी यांना तिथून जवळच असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, आज सकाळी देखील ते व्यायामासाठी गेले होते. व्यायाम केल्यानंतर ते जिममध्ये एका ठिकाणी बसले, त्यांनी पाणी पिलं आणि त्यानंतर अचानक त्यांना भोवळ आली, ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मिलिंद कुलकर्णी यांची पत्नी देखील एक डॉक्टर आहे, या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!