महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. गजानन महाराज शिक्षण संस्था तसेच श्री विघ्नगर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका निलम तांबे यांचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन विशेष गौरव। करण्यात आला. माजी आमदार अश्विनीताई जगताप आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक गिरीश छेडा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, विश्वस्त ऐश्वर्या रेणुसे, नगरसेवक विशाल तांबे, ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, प्राईड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शर्मिला पांडे व विलासराव भणगे उपस्थित होते.

जिजाऊ व बालशिवाजी यांचे प्रतीक असलेले सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मोत्याची माळ, शाल व पुस्तके देऊन गणेश कला क्रीडा मंदिर येथे निलम तांबे यांना सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी पुरस्काराचे हे नववे वर्ष होते.
या वेळी निलम तांबे यांच्या वतीने विशाल तांबे यांनी मनोगत व्यक्त करत हा गौरव अभिमानास्पद असल्याचे सांगून चिंतामणी ज्ञानपीठाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

















