Google Ad
Uncategorized

प्रभागातील आरक्षण कसे असणार … पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 27 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत ३२ प्रभागातून एकूण १२८ नगरसेवक चार सदस्यीय पद्धतीने निवडले जाणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महापालिकेची अंतिम प्रभागरचना सहा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये सहा प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आरक्षणातही फेरबदल होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून ४ नोव्हेंबरपर्यंत आयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

Google Ad

यंदाच्या निवडणुकीत ‘एससी’साठी २०, ‘एसटी’साठी ३, ‘ओबीसी’साठी ३५ आणि खुल्या गटातील ३५ अशा एकूण जागांवर महिलांचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातील अ, ब, क, ड या जागांवर महिलांचे आरक्षण लागू होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सोडत प्रक्रिया पूर्ण करून ११ नोव्हेंबर रोजी निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना प्रारूप आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार असून, १ डिसेंबरपर्यंत आयुक्तांकडून या हरकतींवर निर्णय घेतला जाईल. शेवटी, २ डिसेंबर रोजी आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.

या आरक्षण प्रक्रियेनंतर आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक व पक्षपदाधिकाऱ्यांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

सोडत काढण्यासाठी ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसांची मुदत आयोगाने दिली असून, नेमकी सोडत कोणत्या दिवशी काढायची याचा निर्णय महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित मुदतीत सोडत घेण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून पारदर्शक ड्रॅममधून चिठ्ठी काढली जाते. त्यानुसार त्या प्रभागात महिला व पुरूष असे आरक्षण निश्चित केले जाते. यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना स्वीकारण्यात येणार आहेत.

 

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!