महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑक्टोबर :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उदघाटन गुरुवारी सकाळी १२ वाजता सांगवी गावठाण येथील तलाठी कार्यालयात संपन्न झाले.
सांगवी परिसरात आतापर्यंत एकही आधार केंद्र कार्यरत नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महा ई-सेवा केंद्राला नवीन आधार केंद्र मंजूर झाल्याने नागरिकांना आता सर्व आधारसंबंधित सेवा सांगवीतच उपलब्ध होणार आहेत.

या प्रसंगी मा. महापौर माई ढोरे, जवाहर ढोरे, मा. नगरसेवक प्रशांत शितोळे, मा. नगरसेवक हर्षल ढोरे, मा. नगरसेवक संतोष कांबळे, मा. नगरसेविका सुषमा तनपुरे, शिवराज शितोळे, ह.भ.प. बबरूहन महाराज वाघ, प्रमोद अप्पा ठाकर, दिलीप तनपुरे, उज्वला ढोरे, गणेश ढोरे, धम्मरत्न गायकवाड, विश्वनाथ शिंदे, चेतन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन ओंकार महेश भागवत (कार्याध्यक्ष – सांगवी विकास मंच) यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण भागवत यांनी केले. कार्यक्रमाला सांगवीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


