Google Ad
Uncategorized

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, म्हणत अजित पवारांचा पिंपरी चिंचवडकरांना इशारा… ज्याचे फ्लेक्स जास्त त्याचं बटन दाबू नका,

अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून- मधून बीड चा दौरा काढत जा. त्यामुळं शहर स्वच्छ होत. शहर स्वच्छ झालं की समजायचं अजित पवारयेत आहेत. अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली. पुढे ते म्हणाले, एक वेळ स्वच्छतेवरून स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्यावर चिडलो होतो. ते मला स्वच्छते संदर्भात सांगायचे. पण ते सिंगापूरमध्ये एक आणि मुंबई विमानतळावर वेगळं वागायचे. पुढे ते म्हणाले, परदेशात आपण नियम पाळतो. मग आपल्या देशात का? नाही. तिथं कचरा टाकला की चक्की पिसावी लागते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चौफेर फटकेबाजी करत जोरदार भाषण केल आहे. ज्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स जास्त त्यांच आगामी निवडणुकांमध्ये बटन दाबू नका. असा सल्ला अजित पवारांनी पिंपरी- चिंचवडकरांना दिला आहे. आता हा टोला नेमका कोणाला आहे. यावरून चर्चा रंगली आहे. फ्लेक्समुळे अपघात होतात. छान फलक असल्यास त्याकडे वाहनचालक बघतो आणि अपघात होतो. अस ही अजित पवारांनी म्हटलं आहे. ते पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Google Ad

जो जास्त काम करतो, त्याचे फ्लेक्स कमी असतात आणि जो कामच करत नाही. त्याचे फ्लेक्स जास्त असतात. आता ज्याचे फ्लेक्स जास्त त्याच बटन दाबू नका. असा सल्ला अजित पवारांनी पिंपरी- चिंचवडकरांना दिला आहे. त्यामुळे इच्छुकांची गोची झाली एवढं मात्र नक्की …

अजित पवार पुढे म्हणाले, “बारामतीत अनधिकृत फ्लेक्स लावू नका. अस आम्ही परिपत्रक काढलं आहे. ज्याने फ्लेक्स लावला आणि ज्याचे ते फ्लेक्सचे बांबू आहेत. त्या दोघांवर गुन्हा दाखल केला जात आहे. तसा त्यांचा बंदोबस्त केला जातो. पिंपरी- चिंचवड शहरात ही तस धोरण राबवा. अस आवाहन अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केलं. मग तो फ्लेक्स देवेंद्र भाऊ यांच्या असो की अजित पवारांचा. काही जण स्वतःचा फोटो मोठा दिसावा म्हणून आमचे फ्लेक्स लावतात.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!