महाराष्ट्र 14 न्यूज, दिंनाक -15 ऑगस्ट 25,नवी सांगवी
प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने *79 वा स्वातंत्र्यदिन* उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव मा.आमदार.श्री. शंकरशेठ जगताप,माजी आमदार अश्विनीताई जगताप, मेजर दत्तात्रय भट,श्री दीपक कळसकर,सौ. कळसकर,श्री. लक्ष्मण येडगे, श्री जयराम पाटील नगरसेवक श्री. सागर आंघोळकर, श्री. महेश जगताप श्री. शशिकांत कदम,सौ. माई ढोरे, सौ. शारदाताई सोनवणे,सौ. उषाताई मुंडे,श्री. सूर्यकांत गोफणे, श्री संतोष कांबळे,श्री. तावरे,सौ स्वाती पवार मॅडम,श्री. विजय जगताप, डॉ.विकास पवार, प्रा.श्री. प्रताप बामणे सर उपस्थित होते. तसेच पदाधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शवली.

दीप प्रज्वलाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्व प्रतिष्ठित नगरसेवक, पदाधिकारी व कॉलेज व शाळेच्या प्राचार्या , सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते व्यर्थ गेलेले नाही.यासाठी विविध उपक्रम राबवत *’हर घर तिरंगा’* अर्थातच “घरोघरी तिरंगा” , हा स्तुत्य उपक्रम मोठ्या पातळीवर राबविण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध *देशभक्तीपर,मनोगते, गीते, नृत्य* सादर करून देशाबद्दल अभिमान जागृत केला.
प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुलांनी *पुलवामा हल्ला, ऑपरेशन सिंदूर यांची प्रात्यक्षिके* *मार्शल आर्ट* – तलवार बाजी,लाठी काठी,असेल व *मल्लखांब* यांची विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली यातून विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन घडविले.
अशा या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवर, प्रतिष्ठित,शाळेचे पी.टी.ए मेंबर, नगरसेवक,कॉलेजच्या प्राचार्या सौ. इनायत मॅडम , सर्व शिक्षक वृंद पालक वर्ग मोठ्या उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा ठिगळे,कु. समिना शेख यांनी केले तर आभार सौ.श्यामली पवार यांनी मानले.


