महाराष्ट्र 14 न्यूज :- 01 ऑगस्ट 2025

️ पिंपरी चिंचवडकरांनो, ‘महाराष्ट्र14 न्यूज’ टॉपच्या घडामोडी नक्की वाचा!
- काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर यांचा समावेश आहे.
▶️ विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय.
▶️त्यावर शिक्कामोर्तब झालंय. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय.
१५० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ५७ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध
ℹ️ तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असण्याची शक्यता आहे. भरणे यांच्या नावाची अद्याप घोषणा झाली नाही.
▶️ दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं खातं बदलतं त्यांची खुर्ची वाचवलीय. मात्र झालेला खातेबदल हाही कोकाटेंना एक मोठा इशाराच असल्याचं मानलं जातंय.
पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट — डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी.
▶️ भारतापुढं ट्रम्प यांचं नमतं ? 25% आयातशुल्काच्या निर्णयास तूर्त स्थगिती, कारण…*
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळं भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या कैक वस्तूंपैकी प्रामुख्यानं स्मार्टफोन, हिरे, दागिने, वाहनांचे स्पेअर पार्ट अशा वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होऊन त्याचा थेट परिणाम आर्थिक गणितांमध्ये होणार असल्याचं स्पष्ट होतं.
इथं जागतिक स्तरावर या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेच्या व्यवहारांमध्ये मीठाचा खडा पडल्याचं चित्र असतानाच आता एकाएकी ट्रम्प सरकारनं याच निर्णयाच्या बाबतीत नमकं घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची आयातशुल्कासंदर्भातील भूमिका ठाम असली तरीही सध्या मात्र त्यांनी या निर्णयाला तूर्त 7 दिवसांची स्थगिती दिल्यानं ते एक पाऊल मारेह आल्याचं म्हटलं जात आहे. नव्या माहितीनुसार आता आयात शुल्कासंदर्भातील नियम व अटी 7 ऑगस्टपासून लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाला त्यांच्या यंत्रणेमध्ये काही महत्त्वुपूर्ण बदल करण्यासाठी हा वेळ देणं अपेक्षित असल्या कारणानं निर्णयाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे.
*♂️ ऑगस्ट महिना सुरु होताच LPG सिलेंडरच्या दरात मोठी घट, ग्राहकांसाठी आनंदाची बातमी*
▶️ तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 33.50 रुपयांची घट झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्याच्या अधाव्यानंतर व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आले.
दिल्लीत आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1665 रुपयांवरून 1631.50 रुपये झाली आहे. मात्र 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिक निराश झाले आहेत. घरगुती वापराच्या गॅसचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही.
याआधी व्यावसायिक सिलेंडरचे जुलैमध्ये 58.50 रुपये, जूनमध्ये 24 रुपये, मेमध्ये 14.50 रुपये आणि एप्रिलमध्ये 41 रुपयांनी दर कमी झाले होते. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग पाचव्या महिन्यात कपात झाली आहे. या सलग कपातीमुळे व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील महिन्यात घरगुती गॅसचे दर कमी होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी; अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले, नेमकं काय घडलं?
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये रात्री उशिरा मोठा पक्षप्रवेश पार पडला.
- ठाकरे गट व काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करत मोठा राजकीय धक्का दिला.
काँग्रेसने आमदारकी देऊनही गद्दारी, गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर कट्टर विरोधक खोतकरांचा टोला, म्हणाले, भ्रष्टाचार लपवण्यासाठी हा डाव
महादेवी’च्या पायाला जखम; हत्तीणीचे चिमटे काढणाऱ्या माहुताचा ‘तो’ व्हिडिओ पाहून संताप, ‘वनतारा’त ती सुरक्षित आहे?
गद्दारांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल! पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत


