Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरव येथे हड्डी रोग निवारण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या हड्डी रोग निवारण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आयोजन २६ मे ते ३० मे २०२५ दरम्यान करण्यात आले असून, हड्डी व सांधेदुखीच्या समस्यांवर योगसाधनेच्या माध्यमातून उपचार व जनजागृती हे शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन, सरस्वती वंदना आणि स्वागत भाषण झाले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सौ. संजीवनी देशमुख,श्री. रविंद्र पालकर, सौ. प्रतिभा पाटील आणि शिबिर प्रमुख श्रीमती कांता दाराल यांचा समावेश होता. योग शिक्षक श्री. प्रशांत गोतमारे यांनी सुत्रसंचालन केले.

Google Ad

पहिल्या दिवशी सौ. मीनाक्षी खैरनार यांनी योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. सौ. सुनंदा श्रीखंडे, सौ. अनिता कदम, श्री. अनिल बाबर आणि श्री. प्रकाश घोडके यांनी प्रात्यक्षिक सादर केले. सौ. तनुजा बाबर यांनी “हड्डी रोग का अर्थ व कारण” या विषयावर, तर श्री. गिरीश काटे यांनी “संस्थान परिचय” या विषयावर माहिती दिली.

शिबिराच्या आयोजनात सौ. तनुजा बाबर, सौ. अनुसया गायकवाड, सौ. सुरेखा कदम, सौ. अनिता रेवस्कर, सौ. माधुरी महाले, सौ. शालिनी वाळके, श्री. शंकर कुंभार, श्रीमती कांता दाराल, श्री. अनिल बाबर, सौ. आशा धोत्रे, सौ. दर्पण कदम, सौ. संजीवनी कोकितकर, सौ. शुभदा माने, सौ. डिंपल गुप्ता, सौ. आशा पवार, सौ. ललिता जाधव, श्री. सुरेश घोरपडे,सौ. शारदा शिंदे,सौ. सुनीता पवार,सौ. आशा घावटे, कु. शुभम बाबर, श्री. विलास चिंचणे, सौ. चंपा चव्हाण, श्री. प्रकाश घोडके, श्री. प्रशांत गोतमारे, सौ. सुनीता घोडके, सौ. मीनाक्षी खैरनार आणि इतर कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

शिबिराच्या पुढील दिवसांमध्ये विविध योग शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि हड्डी व सांधेदुखीवरील उपायांवर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी सकाळी ५:३० वाजता उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना हड्डी व सांधेदुखीच्या समस्यांवर योगसाधनेच्या प्रभावी उपायांची माहिती मिळणार आहे. या उपक्रमामुळे पुणेकरांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!