Google Ad
Uncategorized

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक परिचारीका दिन सर्वत्र साजरा केला जातो. आज (दि.13 मे) सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उपस्थितांच्या हस्ते परिचारिकांच्या आद्य दैवत फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आमदार शंकर जगताप मित्र परिवाराच्या वतीने परीचारिकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करून परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिचारिकांनी हातात मेणबत्ती घेत, आपण करत असलेले आरोग्य सेवा कार्य यापुढेही असेच सुरू राहील ही आपल्या कर्तव्याची शपथ घेतली.

Google Ad

भारतावरच काय तर संपूर्ण जगात असलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमुळे सर्वांवर कोरोनाचे संकट आले होते. या संकट काळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून २४ तास कोरोनाच्या रुग्णांना सेवा देत अनेक नागरिकांचे प्राण याच परीचारीकानी वाचवले आहेत, आणि आजही ते आपले कर्तव्य पार पडताना दिसत आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर रोगावरती नियंत्रण आणण्यामध्ये परिचारिकांचा मोलाचा वाटा होता. असे मत माजी नगरसेविका शारदाताई सोनवणे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, सागर अंघोळकर, शारदाताई सोनवणे, डॉ. देविदास शेलार, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे, गणेश ढोरे, तसेच डॉ. तृप्ती सागळे – जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. वैशाली भामरे – नोडल अधिकारी, डॉ. जयश्री शेलार – प्रभारी वैद्यकीय अधिकारी, डॉ. करुणा साबळे – वैद्यकीय अधिकारी, डॉ शरद पोळ- प्रभारी वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इंचार्ज- श्रीम सुवर्णा ताटे, सिस्टर इंचार्ज – श्रीम ललिता पोखरकर , सीनियर ए एन एम- श्रीम सुप्रिया अघाव, श्रीम मंगल बांगर, स्टाफ नर्स- श्रीम कविता कामतकर, श्रीम रुपाली पवार आणि सांगवी झोन मधील सर्व स्टाफ नर्स आणि ए एन एम उपस्थित होते.डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकाही दिवसरात्र आजारी लोकांची सेवा करतात. प्रत्येक रुग्णालयात तुम्हाला रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका दिसतात. त्यांना पाहून आपल्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण होतो. दरवर्षी १२ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. हा दिवस खास आहे कारण १८२० मध्ये याच दिवशी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म झाला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!