महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या कतृत्वाला प्रोत्साहन देण म्हणजेच तिचा सन्मान. या तत्वावर चालणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाने जागतिक महिला दिवस २०२५ मनशांती हॉल, तानाजीराव शितोळे सरकार उद्यान, सांगवी येथे साजरा केला.
कार्यक्रमाची सुरवात मंडळाच्या जेष्ठ महिला सभासदांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली. तसेच नृत्य स्वरूपात गणेश वंदना कु. वैदही बागवे आणि कु. आयुष्य राऊळ या दोघींनी सादर केली.यावेळी श्रीमती अश्विनी ताई जगताप मा. आमदार, चिंचवड विधानसभा, सौ. माई ढोरे. माजी महापौर पिंपरी चिंचवड मनपा, माननीय तेजश्री म्हैसाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक सांगवी पो़लीस स्टेशन, ऍड. सौ. स्वाती गडाख, नोटरी भारत सरकार, शिवाजी नगर, सौ. मेघा झणझणे, योग प्रशिक्षक, ब्रम्ह चैतन्य योग परिवार पुणे, श्री अजय पाताडे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, ऍड चंद्रकांत गायकवाड सेक्रेटरी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, श्री अरुण दळवी उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, श्री अभय नरडवेकर संचालक गणेश सहकारी बँक आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सभासदांनी गित गायन, नाट्य छटा, रॅम्प वॉक, झुंबा डान्स, योगासन व मनोरंजनात्मक खेळामधे सहभागी होऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. रॅम्प वॉक चे प्रतिनिधीत्व शुभांगी कदम व दिपा सावंत यांनी केले तर योगाचे प्रतिनिधित्व सौ स्मिता धुरी यांनी केले. सौ शितल गवस व सौ मयुरी सावंत यांनी आपल्या सुमधुर आवाजातील गित गायनाने सर्वांना मंत्र मुग्ध केले.
मनोरंजनात्मक खेळ बलून फोडणे मधे ७४ वर्षीय जेष्ठ सभासद सौ. अर्चना काटे व अहिल्या सावंत या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला तर वैशाली कदम व शोभा राऊत या जोडीने द्वितीय क्रमांक मिळवला. स्ट्रॉं केसात लावणे मधे सायली राऊळ व समिक्षा राऊळ या जोडने प्रथम क्रमांक मिळवला तर स्मिता सावंत व उर्मिला सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. बॅक लंगडी या खेळामधे प्रथम क्रमांक सौ प्रिती चिपकर तर द्वितीय क्रमांक प्रणाली नाईक यांनी पटकावला.
सौ प्रिती चिपकर या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणे मिस क्वीन च्या मानकरी ठरल्या.
आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या प्रमुख पाहुण्या महिलांनी उपस्थित सर्वांना महत्व पूर्ण मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ सांगवी विभागाचे कार्यकर्ते श्री नंदकिशोर सावंत, श्री विजय महाडिक, श्री राजाराम ठोंबरे, श्री संतोष धुरी, सौ पूजा महाडिक, आणि सभासदांनी महत्वपूर्ण भुमिका निभावली तर मंडळाच्या इतर विभागातील सभासदांचेही सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष साटम यांनी केले. तसेच श्री अभय नरडवेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
