॥ रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा ॥
महाराष्ट्र 14 न्यूज, दि २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, अटल चॅरिटेबल फौंडेशन, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने • पी.डब्ल्यू.डी. मैदान, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे – २७ येथे दिनांक दि.२८ फेब्रुवारी २०२५ आणि ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते ०६.०० वा. पर्यंत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या “६२ व्या” जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मणभाऊंचा वारसा रुग्णसेवेचा… संकल्प जनतेच्या निरोगी आयुष्याचा
शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आमदार शंकर पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाआरोग्य होत आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले आहे. यामध्ये मोफत कॅन्सर तपासणी, मोफत X-Ray, मोफत सोनोग्राफी, मोफत सर्व रक्त तपासण्या, मोफत डायलिसीस आणि उपचार करण्यात येणार आहेत.

▶️शिबीरात होणाऱ्या तपासण्या व शस्त्रक्रिया :-
• हृदय रोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण किडनी विकार व प्रत्यारोपण कॉकलर इन्प्लान्ट लिव्हर प्रत्यारोपण गुडघे प्रत्यारोपण हाडांचे व मणक्यांचे आजार
• हिप प्रत्यारोपण कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी रेडीएशन प्लास्टिक सर्जरी दंतरोग नेत्ररोग बालरोग व शस्त्रक्रिया मोफत श्रवणयंत्रे मेंदूची शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार मुत्र मार्गाचे विकार त्वचा विकार फाटलेली टाळू व ओठांवरील शस्त्रक्रिया बॉडी चेकअप एपिलीप्सी फिट येणे कान-नाक-घसा अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी किशोरवयीन मुलींचे समुपदेशन गरोदर माता तपासणी स्त्री रोग हिमोग्लोबिन तपासणी तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया मोफत अॅन्जोप्लास्टी अपंगांना अत्याधुनिक कृत्रिम हात व पाय आणि कॅलीपर्सचे मोफत वाटप मोफत चष्मे वाटप आयुर्वेदिक न्युरोथेरेपी योगा युनानी सिध्दा होमिओपॅथी नॅचरोथेरपी
▶️शिबीरात सहभागी होणारी रुग्णालये :-
•ससून हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय औंध वाय. सी.एम. रुग्णालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालये टाटा मेमोरिअल हॉस्पिटल (मुंबई)
आदित्य बिर्ला हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सिल्व्हर बर्च मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे भारती हॉस्पिटल इन्लॅक्स बुधराणी इन्स्टिट्यूट एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल मणिपाल हॉस्पिटल व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर एम्स हॉस्पिटल, औंध पुना हॉस्पिटल लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड) लाईफ पॉइंट मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल पवना हॉस्पिटल अकॉर्ड हॉस्पिटल सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मेडिकोव्हर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व्हेंसर हॉस्पिटल गुंजकर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल रूबी एलकेअर सर्व्हिस लिमिटेड ऑक्सिकेअर हॉस्पिटल आयसीटीआरसी वाघोली ईशा नेत्रालय हॉस्पिटल जीवनज्योती हॉस्पिटल पायोनियर हॉस्पिटल उषाकिरण हॉस्पिटल, हडपसर विघ्नहर्ता हॉस्पिटल आयुर्वेदिक न्युरो थेरपी नारायण धाम आयुष हॉस्पिटल, पुणे ए.एस.जी. आय हॉस्पिटल ओंकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सूर्य सह्याद्री रुग्णालय भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती डिपार्टमेंट ऑफ प्रोस्थेटिक्स अँड ऑथॉटिक्स एम.जि.एम. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस वेदांत सेंट्रल हॉस्पिटल (मुंबई) ओम नेत्रालय मयुरेश हॉस्पिटल बी. के. एल. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय, चिपळूण नवभारत विकास फाऊंडेशन, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आयुर्वेदिक न्युरो रिसर्च सेंटर पुणे
▶️सोबत आणावयाची आवश्यक कागदपत्रे :
१. ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड) २. पुर्वी काही आजार असल्यास त्याचे कागदपत्रे / मेडीकल रिपोर्ट्स
▶️दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकां करिता विशेष :-
भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (ALIMCO) मुंबई व लक्ष्य फाऊंडेशन, म.रा. यांच्या सहकार्याने “दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात येणार आहेत.
चालण्याची काठी (उंची कमी जास्त होणारी), चालण्याची काठी (उंची फिक्स), कोपर काठी (उथी फिला), अल्युमिनिअम कुबड्या, चार पायाची काठी, तीन पायाची काठी, तीन पायाची काठी, कॅलिपर्स, अत्याधुनिक कृत्रिम पाय, श्रवण यंत्र,बाकाची घडीची खुर्ची, चालण्याची काठी, कमोड व्हील चेअर, कमोड चेअर, व्हील चेअर, बुटातील कुशन, संपूर्ण पाठीचा पट्टा, कृत्रिम हात, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, ब्रेल कीट, मोटराईज ट्राय सायकल (८० % अपंगांना), सी.पी. घेअर, ट्राय सायकल, स्मार्ट फोन, सुगम्य केन, गुडघ्याचा पट्टा
दिव्यांग लाभार्थी करिता :-
१. आधार कार्ड झेरॉक्स २. दिव्यांग प्रमाणपत्र (४०% वरील)
३. उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्ड झेरॉक्स (मासिक २२५००/- च्या आत)
४. यू.डी.आय.डी. कार्ड प्रेरॉक्स (४०% वरील)
६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी
१. आधार कार्ड झेरॉक्स (६० वर्षावरील वय दर्शविणारे)
२. उत्पन्न वा दाखला अवघा रेशन कार्ड प्रेरॉक्स (मासिक १९०००/- च्या आत)
टिप- मागील ३ वर्षात लाभ घेतलेले लाभार्थी अपात्र ठरतील. (बैटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल आणि स्मार्ट फोन साठी मागील ५ वर्षात लाभ घेतलेला नसावा.)