महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून *डॉ. प्रिया बोराडे ,डॉ. प्रमोद बोराडे,सौ.सिमा सुकाळे,सौ स्वाती पवार मॅडम*,*सर्व पीटीए* सदस्य उपस्थित होते .विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परीधान केलीे होती. शिवाजी महाराज यांच्या जीवनपट— शिवजन्म,शिवगर्जना, स्वराज्य मोहीम यांची ओळख विद्यार्थ्याना करुन देण्यात आली.ऐतिहासिक पोवाडा सादर करण्यात आला.
श्री. सांबारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाटी-काठी व तलवारबाजी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
विद्यार्थ्यांनी गड, किल्ले, शिवाजी महाराजांनी वापरलेली हत्यारे इत्यादी चे ऐतिहासिक प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे व पालकांनी भेट दिली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी शेवटी *शिवाजी महाराज की जय व जय भवानी , जय शिवाजी* अशा घोषणा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *श्री.डॉ. प्रमोद बोराडे* यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे त्रिसूत्री 1.निर्व्यसनी राहणे, 2.निर्माण क्षमता 3.चारित्र्यवान यावर भर दिला. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव, आमदार श्री. शंकरभाऊ जगताप , संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विजय जगताप, सर्व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. संस्था सदस्या सौ.स्वाती पवार मॅडम,मुख्याध्यापिका सौ.इनायत मुजावर मॅडम इ.मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन- सौ स्वाती यावले, सौ शिल्पा ठिगळे तर आभार- सौ.सुवर्णा गडपोल यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर देखील उपस्थित होते.