Google Ad
Uncategorized

तरुण चेहरा म्हणून ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या मंत्रीमंडळात ‘शंकर जगताप’ यांना स्थान मिळणार

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे शंकर जगताप यांनी आघाडी घेत अखेरीस १ लाख ३ हजार ८६५ एवढ्या मोठ्या मतांनी विजयश्री पटकावला, राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्यात शंकर जगताप हे आठव्या क्रमांकावर आहेत.

Google Ad

राज्याच्या राजकारणात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची भाजप महायुतीचे धोरण असल्याने ‘शंकर जगताप‘ यांना मंत्री पद मिळण्याची फार मोठी संधी आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांनी आपला चिंचवडचा राजकीय गड शाबूत ठेवला, आणि प्रथमच मोठया मताधिक्याने विजय मिळवत चिंचवड चे नाव राज्याच्या राजकारणात सर्वात पुढे नेहुन ठेवले.

विधानसभा निवडणुकीच्या (Pune Assembly Elections) निकालानंतर जिल्ह्यातील कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याविषयीची उत्सुकता लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे खूप चांगले संबंध असल्याने एक तरुण उमदा चेहरा म्हणून शंकर जगताप यांच्याकडे पाहिले जाते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भाजपची ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडू शकते असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात भाजप च्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले शहरात तरुणांचा ‘आयकॉन‘ म्हणून ही त्यांच्याकडे तरुण कार्यकर्ते आकर्षित होताना दिसतात आणि त्यांच्या सोबत असणारे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे याचाच फायदा झाल्याचे त्यांना झालेल्या निवडणूकित दिसून आला.

नवी सांगवी- पिंपळे गुरवची मोठी साथ :

ते राहत असलेल्या पिंपळे गुरव आणि नवी सांगवी च्या भागाने त्यांचे मोठे मताधिक्य दिल्याने खूप मताधिक्य वाढल्याचे या निवडणुक निकालात दिसून आले. नवी सांगवी भागात तर त्यांच्या सोबत एकच नगरसेवक आणि कार्यकर्ते प्रचार यंत्रणा सांभाळताना दिसत होते, खरे तर या प्रमाणिक कार्यकर्त्यामुळेच या भागात त्यांना जास्तीचे लीड मिळाले.

शंकर जगताप असेही म्हणाले, “आगामी महानगर पालिका निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढणार असून पुन्हा महानगर पालिकेवर महायुतीची सत्ता येईल. असा विश्वास ही जगताप यांनी व्यक्त केला आहे. मंत्री पदाबाबत शंकर जगताप यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. चिंचवडमध्ये भाजप च्या कार्यकर्त्याला मंत्री पद मिळत असेल तर त्याच स्वागत करतो” त्यानंतर त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्याचे धन्यवाद मानले.

शंकर जगताप यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळणार अशी अपेक्षा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!