Google Ad
Uncategorized

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; आचारसंहिता लागणार ? उत्सुकता वाढली

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१४ ऑक्टोबर :राज्यात विधानसभा निवडणुकांचं बीगुल लवकरच वाजणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी येत्या 72 तासांत आचारसंहिता लागेल, असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवार, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठक होत आहे.

Google Ad

त्यात सत्ताधारी सरकार एकापाठोपाठ निर्णय घेत सुटली आहे. अगदी रविवारच्या दिवशीही मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अशी चर्चा रंगली आहे की, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

कारण आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी मंत्रिमंडळाने सकाळी सकाळी 9.30 वाजता बैठक ठेवली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे संकेत दिलीय की, येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु होणार आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचा आढावा दौरा केला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत २६ नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असेल, हे लक्षात घेतल्यास कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. कारण, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत पहिले अधिवेशन घ्यावे लागणार आहेत.

वेगवेगळे दावे, पण निवडणुका कधी ?

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ किंवा १७ ऑक्टोबर रोजी राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. तर आयएएस लॉबीमधील अंदाजानुसार १५ ऑक्टोबरपासूनच आचारसंहिता जाहीर होऊ शकते. आचारसंहिता कधी लागणार, याबाबतचे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारपर्यंत आचारसंहिता लागण्याचा अंदाज वर्तवला आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!