महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ ऑक्टोबर) : देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण दसरा आणि दिवाळी म्हणजे दीपोत्सव … मात्र, आजही समाजातील अनेक घटक असे आहेत ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी समाजातील अनेक हात पुढे येतात. असाच एक हात भोसरी येथील पताशीबाई लुंकड अंध शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला.
नवरात्रात देवीच्या दर्शनाचा लाभ मिळाल्यानं या अंध विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, निमित्त होते काटे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र जगराच्या आरतीचे…
नेहमीच समाजातल्या तळागाळात जाऊन आनंदाचे क्षण घेऊन ते पोहोचणाऱ्या सुभाष दादा काटे आणि त्यांच्या परिवाराने या दिव्यांग (अंध) मुलांचा आनंद द्विगुणित आणि गोड केला. यावेळी मुलांनी महालक्ष्मी देवीची आरती केली व देवीला आपली भजन सेवा अर्पण केली. यावेळी उपस्थित सर्वानी मुलांच्या गायनाचे कौतुक केले. सुभाष दादा काटे यांनी या मुलांना या अगोदर ही दिवाळी फराळ, वेगवेगळ्या ठिकाणी सहली, तसेच त्याच्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
काटे परिवाराच्या वतीने आमच्या जीवनातील दिवाळी प्रकाशमय व्हावी, म्हणून करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.