Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यात सांगवी येथील टि.बी. यूनिटच्या वतीने ‘निक्षय मित्र’ उपक्रम …२५ क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट)  : महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय सांगवी अंतर्गत पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या दवाखान्यात सांगवी येथील टि.बी. यूनिटच्या वतीने ‘निक्षय मित्र’ उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, सांगवी रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, एमओ सीटीसी डॉ. गोविंदा नरके, वैद्यकीय अधिकारी डॉ. करुणा साबळे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
सांगवी टि.बी. यूनिटच्या वतीने ‘निक्षय मित्र’ उपक्रमात २५ क्षय रूग्णांना पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या दवाखान्यात पोषण आहार किटचे वाटप आरोग्य अधिकारी, उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.

रुग्णांना निक्षय मित्र उपक्रमाबाबत डॉ. गोविंदा नरके यांनी माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी टीबी हेल्थ व्हीजिटर मंगल शिखरे, उषा मुंढे, सेवानिवृत्त परिचारिका शोभा थोरात आदी मान्यवर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, क्षयरुग्ण, त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन परिचारिका सुषमा बांबले, मंगल बांगर, आशा सेविका, कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गणेश जवळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad

२५ क्षय रुग्णांना दत्तक घेतले आहे. या क्षय रुग्णांना सहा महिन्यांसाठी पोषण आहार किट पुरविण्यात येणार आहे. शुक्रवार (दि. ३०) आरोग्य वैद्यकीय अधिकारी, उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले आहे.
उषा मुंढे, पिंपळे गुरव

क्षय रोग आजाराचे निदान व उपचार महापालिकेच्या सांगवी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. रुग्णांनी आहार व औषधे वेळेत घेऊन उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. क्षय रोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी टी.बी. रुग्णाचे नोटिफिकेशन करून महापालिकेला सहकार्य करणे गरजेचे आहे. टी.बी. क्षय रुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेण्यात यावे. त्यांना पोषण आहार यावेळेत उपलब्ध करून देण्यात यावा. यासाठी आपण निक्षय मित्र बनून क्षय रुग्णांसाठी काम करावे.
‘पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहाराचे कीट देण्यासाठी अधिकाधिक दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे. क्षयरोगमुक्त होण्यासाठी प्रयत्न करूया,’ असे आवाहन सांगवी रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!