महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.०७ जानेवारी) : अटल विनामुल्य महाआरोग्य शिबीर : दिवस तिसरा
सुमारे तीन लाख नागरिकांनी घेतले ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चा लाभ लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीरा’चा तिसरा दिवस विक्रमी तपासणीने संपन्न झाला. शिबिराच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी तब्बल १,४६,६६५ नागरिकांनी या शिबिरात तपासणी करून घेतली. तीन दिवसांमध्ये एकून २,९४,२६५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
आज तिसऱ्या दिवशी अटल विनामुल्य महाआरोग्य शिबीराचा समारोपाचा दिवस होता. आज तिसऱ्या दिवशी भाजपा नेते आमदार श्री. राम शिंदे, राजस्थान येथील मारवाड जंक्शनचे भाजपा आमदार श्री. केसारामजी चौधरी यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते व्हीलचेयर्सचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा विनामुल्य उपलब्ध व्हावी, या उद्देश्याने लक्ष्मणभाऊ यांनी ९ वर्षांपूर्वी ‘विनामुल्य शिबिराच्या’ रोपट्याचा वटवृक्षात होणारे रुपांतर पाहताना मनाला वेगळेच समाधान प्राप्त झाले. पाहिल्या दोन दिवसांचा प्रतिसाद पाहताना आज रविवार असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात येणार याची कल्पना असल्यानेच त्यानुसार आजचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी सर्वच भाजपा पदाधिकारी, लक्ष्मणभाऊ जगताप मित्रपरिवाराचे सदस्य, लक्ष्मणभाऊ यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते यांनी मोलाची मदत आणि सहकार्य केले. यामुळेच हे शिबीर सर्वार्थाने यशस्वी झाले असे म्हणता येईल.
आज शिबिराच्या समारोपावेळी शहर सरचिटणीस श्री. विलास मडीगेरी, माजी महापौर माई ढोरे, उपाध्यक्ष राजू दुर्गे, नगरसेवक श्री. अंबरनाथ कांबळे, श्री. संजय जगताप, श्री. रमेश काशीद, श्री. संतोष कलाटे, श्री. शेखर चिंचवडे, श्री. गणेश गावडे, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. यमपल्ले ( जिल्हा शैल्य चिकित्सक), डॉ. ढगे, डॉ. वर्षा डोईफोडे ACS, डॉ राजेंद्र थोरात, सौ. शारदाताई सोनावणे, श्री. प्रमोद ताम्हणकर, श्री. काळूराम नढे, श्री. विनोद तापकीर, डॉ. ढगे, श्री. विलास जगताप, श्री. संदीप नखाते, श्री. मनीष कुलकर्णी, श्री. राहुल जवळकर, श्री. मनोज तोरडमल, श्री. संतोष निंबाळकर, श्री. राकेश भरणे, श्री. विलास पाडळे, श्री. महेश जगताप, माजी नगरसेवक श्री. शांताराम भालेकर, हभप श्री. शिवानंद स्वामी, श्री. सखाराम नखाते यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी, मा.नगरसेवक, कार्यकर्ते, सर्व आरोग्य अधिकारी, हॉस्पिटल वर्ग आणि नागरिक बांधव उपस्थित होते.
शिबिरात या नामवंत हॉस्पिटल ने घेतला सहभाग :-
१) जिल्हा सामान्य रुग्णालय , औंध
२) पिंपरी चिंचवड मनपा, थेरगाव हॉस्पिटल
३) पिंपरी चिंचवड मनपा , सांगवी रुग्णालय
४) पी.जी.आय, वाय. सी. एम हॉस्पिटल, पिंपरी, पुणे
५) ह भ प कुटे रुग्णालय, आकुर्डी
६) यमुना नगर रुग्णालय
७) नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी
८) तालेरा हॉस्पिटल, चिंचवड
९) नवीन थेरगाव हॉस्पिटल
१०) महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग▶️महाआरोग्य शिबीरातील सर्व खाजगी रुग्णालये*
१) आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, थेरगाव, चिंचवड, पुणे
२) अॅकॉर्ड हॉस्पिटल, मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे
३) डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे
४) हिलींग हॅन्ड फाउन्डेशन, ढोले पाटील रोड, पुणे
५) जहांगीर हॉस्पिटल, ससूनरोड, रेल्वेस्टेशनसमोर, पुणे
६) ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे
७) लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड, पुणे
८) मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे
९) नोबेल हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, हडपसर, पुणे
१०) ओम हॉस्पिटल, भोसरी, पुणे
११) नंदादीप आय हॉस्पिटल, पिंगळे सौदागर
१२) आगरवाल आय हॉस्पिटल, औंध
१३) रुबी आयलकेअर कार्डियाक केअर सेंटर, पिंपरी पुणे
१४) रुबी हॉल क्लिनिक, ससूनरोड, पुणे
१५) एच.व्ही.देसाई आय हॉस्पीटल पुणे
१६) महा लॅब
१७) बै.जी. वैद्यकीय महाविद्यालय व ससुन हॉस्पिटल पुणे
१८) मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव पुणे ( कॅन्सर युनिट)
१९) भारती हॉस्पीटल पुणे
२०) जिल्हा रुग्णालय, नेत्र विभाग
२१) व्हिजन नेक्स्ट फांऊडेशन पुणे
२२) सिम्बायोसिस मेडीकल कॉलेज पुणे
२३) डॉ. देशमुख प्रसूती हॉस्पिटल, नवी सांगवी
२४) GHS कोटबागी हॉस्पिटल, औंध
२५) A. S. G. आय हॉस्पिटल, पिंगळे सौदागर
२६) ईशा नेत्रालय
२७) पवना हॉस्पिटल, सोमाटणे
२८) जिल्हा रुग्णालय रक्त पेढी
२९) आयुष विभाग, जिल्हा रुग्णालय
३०) नारायण धाम निसर्गोपचार केंद्र
३१) फार्मसी विभाग, जिल्हा रुग्णालय
३२) फार्मसी विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
३३) लोकनेते लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट
३४) Life point हॉस्पिटल
३५) अक्षय रक्त पेढी
३६) संजीवनी रक्त पेढी
३७) ICTC विभाग
३८)जीवन ज्योती हॉस्पिटल, पिंगळे सौदागर
३९) समर्थ युवा फौंडेशन, महिलांची मॅमोग्राफी मशीन
४०) समर्थ युवा फौंडेशन, महिलांची मॅमोग्राफी मशीन
४१) X Ray van (स्वास्थ्य रथ)
फिरता दवाखाना (मोबाईल मिनी हॉस्पिटल)