महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१५ डिसेंबर) : भारत सरकारच्या वतीने नागरिकांकरीता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना आणि त्यांचा लाभ प्रत्येक्षात लाभ आपल्या भागातील नागरिकांना मिळावा याकरिता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने नवी सांगवी कृष्णा चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालया मध्ये दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रोज नागरिकांसाठी विविध योजनां राबविल्या जात आहेत, या योजनेतून असंख्य नागरिकांना फायदा होत आहे.
त्यामधील मुख्यता योजना म्हणजे नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन मतदान स्मार्ट कार्ड देणे, नियमित रेशन घेणाऱ्या नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळून देणारी पंतप्रधान आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यात सुतार,लोहार, बोट बनविणे, लोखंड आणि इतर धातू पासून विविध वस्तू बनवणारे, मूर्तिकार, सोनार, कुंभार, चर्मकार, राजमेस्ती, बास्केट झाडू चटई बनवणारे,बाहुल्या आणि खेळणे बनवणारे,न्हावी,मालाकार,धोबी टेलर माशांची जाळी विणणारे असे अठरा पारंपारिक हस्तकारागिरी व्यवसायात असलेल्या कारागिरांसाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून त्यांच्या व्यवसाया करता निधी मिळतो. आशा योजनांचा फायदा इतर नागरिकांनी ही घ्यावा असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
याप्रसंगी नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनाचे कार्ड आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र देताना दत्तात्रय भापकर, डॉ. देविदास शेलार, संजय मराठे, शशिकांत नागणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पिंपळे गुरव-सांगवी विभागाचे अध्यक्ष मदन तांदळे, शैलेश जाधव, महेश पांचाळ, ललित म्हसेकर, अंकुश लोखंडे, प्रकाश बेंबरे, अशिष शेळके, रोहित राऊत आधी मान्यवर व योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.