Google Ad
Uncategorized

प्रकृती संवाद कार्यक्रमात संत निरंकारी मिशनने निभावली महत्वपूर्ण भूमिका

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ डिसेंबर) : सदगुरूंच्या आदेशानुसार निरंकारी मिशन मार्फत प्रकृतीचा शोषण होण्यापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच संदर्भात बिगर सरकारी संस्थांमार्फत दिल्लीच्या रामलीला ग्राउंड वर ‘प्रकृती संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी तसेच संत निरंकारी मंडळाचे मेंबर इंचार्ज राकेश मुटरेजाजी सहित यांच्यासह अनेक मान्यवर अतिथि, समाज सेवक, गैर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी,(एन.जी.ओ.) मंत्रीगण, प्रसिद्ध पत्रकार उपस्थित होते.

Google Ad

या कार्यक्रमामध्ये आदरणीय जोगिन्दर सुखीजाजी के यांच्या नेतृत्वाखाली निरंकारी मिशन मार्फत समाज कल्याण व पर्यावरण संरक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक परियोजनांची सविस्तर माहिती पी.पी.टी.च्या माध्यमातून दाखविण्यात आली.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून एक प्रदर्शनीदेखील लावण्यात आली ज्यामध्ये सुंदर व पर्यावरण बनविण्यासाठी मिशनकडून राबविण्यात येत असलेल्या वननेस वन, अमृत प्रोजेक्ट, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता अभियान, तलासरी प्रकल्प अशा अनेक महत्वपूर्ण परियोजनांचा समावेश होता. प्रदर्शनी पाहणाऱ्यांनी या कार्याची अत्यंत प्रशंसा केली.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सुद्धा कित्येकदा आपल्या विचारांतून प्रकृतीला अतिसुंदर बनविण्याचे आवाहन करताना म्हणतात, की ही जी सुंदर प्रकृती आपल्याला मिळालेली आहे तिला याहून अधिक सुंदर रुपात सोडून जायचे आहे.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सुमारे ५०० स्वयंसेवकांनी सद्गुरुंच्या आशीर्वादाने मिळालेल्या निळ्या टी-शर्ट मध्ये सुशोभित होऊन तन्मयतेने आपल्या सेवा निभावत या कार्यक्रमामध्ये हजारांच्या संख्येने सहभागी लोकांना उत्तमप्रकारे नियंत्रित केले.कार्यक्रमामध्ये अनेक वक्त्यांनी प्राकृतिक साधने, संरक्षण आणि पर्यावरणाच्या रक्षणाचे महत्व समजावून देणाऱ्या विषयांवर सागोपांग चर्चा केली. संत निरंकारी मिशनच्या वतीने आदरणीय राकेश मुटरेजाजी यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर आपले विचार मांडताना बाबा हरदेवसिंहजी यांच्या संदेशाची पुनरुक्ती करुन सांगितले, की प्रदूषण केवळ बाहेरचेच नव्हे तर आतील सुद्धा हानीकारक आहे कारण जोपर्यंत आमचे अंतर्मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण बाहेरील वातावरणदेखील स्वच्छ ठेवू शकत नाही. त्यांनी उदाहरणासहित सांगितले, की पंचमहाभूते आपल्यातच सामावली आहेत. आपण प्रकृतीचे अंगच आहोत, प्रकृतीपासून बनलेले आहोत. संत निरंकारी मिशन प्रकृतीशी आपले अतूट नाते समजावून सांगत आहे.

प्रकृती संरक्षणा अंतर्गत जल संरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा दिनांक २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी मिशनमार्फत अमृत प्रोजेक्टचे आयोजन केले जाणार असून समाज कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या नि:स्वार्थ सेवाही निरंतर चालू राहणार आहेत.

प्रकृती संवाद सारखे उपक्रम आणि अशा अनेक परियोजनांचा उद्देश आपली धरती स्वच्छ, सुंदर व निर्मल बनविणे हाच आहे. यामध्ये मिशनदेखील सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आवाहनाप्रमाणे बहुमूल्य सहयोग देत आपली एक महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. कार्यक्रम समाप्तीनंतर चहापानाचा उचित प्रबंध संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत करण्यात आला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!