Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये बालदिन उत्सहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिंनाक – २५/११/२०२३) : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये साजरा करण्यात आला.दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. नेहरूंचा जन्म 1889 मध्ये झाला आणि ते ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जातात. त्यांचे लहान मुलांवर विशेष प्रेम होते. नेहरुंना लहान मुलांची खूप आवड होती. यावेळी शाळेमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात.

या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थ्यांसाठी विशेष करून जादूगाराचा खेळ आयोजन करण्यात आले होते. जादूगार चा खेळ श्री.प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केला त्यांच्या जादूगाराचा खेळाने विद्यार्थी भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कौशल्यात्मक कार्यक्रम विविध कौशल्य यांचे आयोजन केले गेले.

Google Ad

यावेळी विद्यार्थ्यांच्या करमणुकीसाठी वाघ,माकड,हत्ती,मिकी प्रत्यक्ष बाहुलीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. त्याचे नियोजन निकीता पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजू अण्णा जगताप, सचिव शंकर शेठ जगताप,चिंचवड विधानसभा आमदार श्रीमती. अश्विनीताई जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.संस्था सदस्य स्वाती पवार ,श्री.डाॅ.विकास पवार सर,श्री.प्रताप बामणे सर पूर्व प्राथमिक प्राथमिक विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.इनायत मुजावर व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शिक्षक कर्मचारी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!