Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर … मराठी पत्रकार परिषदेच्या ध्येय्य धोरणांशी कटिबद्ध राहण्याचा संकल्प, ‘डिजिटल मीडियाची कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार’ : अध्यक्ष अनिल वडघुले यांची घोषणा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑक्टोबर) : देशभरातील पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी आज सभासद पत्रकारांच्या सर्वानुमते मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष राजू वारभुवन, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पिंपरी चिंचवड समन्वयक सुरज साळवे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. देविदास शेलार व सर्व सभासद पत्रकारांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणी निवडीसंदर्भात गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी पिंपरी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्वानुमते उपाध्यक्ष पदी सुनील पवार, सुरज साळवे व दत्तात्रय कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच विनायक गायकवाड यांची चिटणीस, अशोक कोकणे यांची सरचिटणीस, प्रकाश जमाले यांची सहचिटणीस पदी निवड करण्यात आली. खजिनदार पदी महावीर जाधव, सहखजिनदार पदी पराग डिंगणकर, समन्वयक पदी हर्षद कुलकर्णी, संपर्क प्रमुख पदी सिद्धांत चौधरी व प्रवक्ता पदी जुबेर खान यांची निवड सर्वानुमते करण्यात आली, त्याचबरोबर नितीन कालेकर, अनुष्का कोंडरा, श्रद्धा प्रभुणे, आम्रपाली गायकवाड यांची कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.

Google Ad

यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक व उपस्थित सर्व पत्रकारांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषदेशी तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाशी सदैव एकनिष्ठ राहणार असून परिषदेच्या सर्व ध्येय्य धोरणाचे तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असून पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्परतेने कार्यरत राहण्याचा संकल्प सर्वांनी केला, लवकरच पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या कार्यकारीणीचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे विभागीय सचिव पदी दैनिक राज्य लोकतंत्र चे गणेश मोकाशी यांची मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या उपस्थितीत नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!