महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .१६ ऑगस्ट) : सेईको काई महाराष्ट्र कराटे संघाला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ६ सुवर्ण पदकांसह ३५ पदके मिळाली आहेत. दिनांक ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय निमंत्रित कराटे स्पर्धेत सेईको काई महाराष्ट्र कराटे संघाने ६ सुवर्ण, ५ रोप्य आणि २४ कांस्य अशी एकूण ३५ पदकांची कमाई केली.
स्पर्धेत देशभरातून २४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पोर्ट्स कराटे दो असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस रविंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख प्रशिक्षक संतोष कोलगे, राजेंद्र जाधव, विजय खंदारे, हर्षल बोऱ्हाडे, प्रसाद पवार, आकाश सोनावणे, सुनिता सुर्यवंशी,अभिषेक डांगे, अनुपम कुंभार, सिद्धार्थ वरवंटकर इ. प्रशिक्षकांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. संघ व्यवस्थापक म्हणून परेश रडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पदक विजेते खेळाडू आणि खेळप्रकार खालील प्रमाणे –
सुवर्णपदक विजेते –
१. सानवी गावडे – कूमिते
२. वैष्णवी सुर्यवंशी – काता
३. अनघा तांबे – काता
४. सन्मय चौधरी – कुमिते
५. श्रावणी वानखेडे – काता
६. शिवतेज सुर्यवंशी – कुमिते
रौप्य पदक विजेते –
१. उन्नती हवाले – कुमिते
२. आकाश वरुण – कुमिते
३. ध्रुव झोपे – कुमिते
४. श्रावणी वानखेडे – कुमिते
५. तन्मय करगूप्ता – कुमितेकांस्य पदक विजेते –
१. अनघा तांबे – कुमिते
२. मयुरेश शिंदे – कुमिते
३. लकी अडे – कुमिते
४. नक्षत्रा वाघ – कुमिते
५. यश जगताप – कुमिते
६. अथर्व अल्हाट – कुमिते
७. श्रावणी घाटगे – कुमिते
८. राजवीर चव्हाण – कुमिते
९. कार्तिक सपकाळ – कुमिते
१०. पर्व सुराणा – कुमिते
११. सन्मय चौधरी – कुमिते
१२. हर्षवर्धन नवले – काता
१३. ध्रुव झोपे – काता
१४. सिद्धेश हताले – कुमिते
१५. रोशनी बात्रा – काता
१६. आर्यन बात्रा – काता
१७. यश जगताप – कुमीते
१८. अरबाज काझी – काता
१९. वैष्णवी लोखंडे – कुमिते
२०. तन्मय जाधव – कुमिते
२१. हर्षवर्धन नवले – कुमिते
२२. आर्यन बात्रा – कुमिते
२३. रोशनी बात्रा – कुमिते
२४. रुद्र आव्हाड – काता