Google Ad
Uncategorized

पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रोच्या 18 स्थानकापासून सुरू होणार शेअर रिक्षा, कसे आहेत मार्ग आणि तिकीट दर ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० ऑगस्ट) : पुणेकरांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला आहे.

अशातच पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्यातील मेट्रोच्या 18 स्थानकापासून आणि पुणे रेल्वे स्टेशन पासून एकूण 107 मार्गांवर शेअर रिक्षा चालवण्याचा निर्णय झाला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजेच पुणे आरटीओने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

Google Ad

विशेष बाब अशी की, यासाठी शेअर रिक्षाचे भाडे देखील ठरवण्यात आले आहेत.निश्चितच या निर्णयामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावर सुरू होणाऱ्या शेअर रिक्षामध्ये प्रति व्यक्ती किमान अकरा रुपये ते कमाल 42 रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाणार आहे.

पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे शहरातील 18 मेट्रो स्थानकावरून आणि पुणे रेल्वे स्थानकावरून शेअर रिक्षा सुरू करण्याचे आदेश होते. यानुसार ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

आता मेट्रो स्थानकावरून आणि पुणे रेल्वे स्थानकावरून शेअर रिक्षा सुरू झाली आहे. यामुळे आता पुणे रेल्वे स्टेशनपासून पुलगेट, वाडिया कॉलेज, संचेती हॉस्पिटल अशा मार्गांवर शेअर रिक्षा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती भूर यांनी यावेळी दिली.

तसेच भोर यांनी या शेअर रिक्षासाठी दर निश्चित करण्यात आले असल्याचे यावेळी कळवले आहे. तसेच मेट्रोचे प्रवासी फक्त शेअर रिक्षासह प्रवास करू शकतात असे नाही तर ते मीटरनेही प्रवास करू शकणार आहेत. दरम्यान आता आपण शेअर रिक्षाचे मार्ग आणि भाडे किती असणार याबाबत जाणून घेणार आहोत.पुण्यातील

मेट्रो स्थानापासून सुरू झालेल्या शेअर रिक्षाचे मार्ग आणि भाडे

  • सिव्हिल कोर्ट ते फडके हौद/ कमला नेहरू रुग्णालय, सिव्हिल कोर्ट ते जे. एम. कॉर्नर/ मॉडर्न शाळा, नळस्टॉप ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दरम्यान प्रति व्यक्ती अकरा रुपये भाडे राहणार आहे.
  • वनाझ ते महात्मा सोसायटी/एकलव्य कॉलेज, वनाझ ते कर्वे पुतळा, रुबी हॉल ते जीपीओ, पुणे महापालिका ते लक्ष्मी रोड/स्वीट होम दरम्यान प्रति व्यक्ती 12 रुपये भाडे राहणार आहे.
  • पुणे रेल्वे स्टेशन ते पोलिस आयुक्त कार्यालय, नाशिक फाटा (भोसरी) ते एमआयडीसी कॉर्नर दरम्यान प्रतिव्यक्ती 13 रुपये भाडे राहणार आहे.
  • पीसीएमसी ते साई चौक दरम्यान प्रतिव्यक्ती 14 रुपये भाडे राहणार आहे.
  • रुबी हॉल ते एसजीएस मॉल, गरवारे कॉलेज ते टिळक रोड/ सदाशिव पेठ, नळस्टॉप ते सिम्बायोसिस कॉलेज, दापोडी ते जुनी सांगवी दरम्यान प्रति व्यक्ती 15 रुपये भाडे राहणार आहे.
  • नाशिक फाटा ते पिंपळे गुरव या मार्गावर शेअर रिक्षा सुरू झाली असून या शेअर रिक्षामध्ये प्रतिव्यक्ती 17 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
  • पुणे रेल्वे स्टेशन ते एमएसईबी (रास्ता पेठ), शिवाजीनगर ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान सुरू करण्यात आलेल्या शेअर रिक्षामध्ये प्रति व्यक्ती 21 रुपये भाडे आकारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  • पीसीएमसी ते केएसबी चौक या मार्गावर सुरू झालेल्या शेअर रिक्षामध्ये प्रतिव्यक्ती 22 रुपये भाडे राहणार आहे.
  • दापोडी ते नवी सांगवी या मार्गावर देखील शेअर रिक्षा सुरू झाली असून या मार्गावरील शेअर रिक्षामध्ये प्रति व्यक्ती 25 रुपये भाडे राहणार आहेत.
  • शिवाजीनगर ते दीपबंगला चौक या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या शेअर रिक्षेत प्रति व्यक्ती 28 रुपये भाडे राहणार आहे.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!