Google Ad
Uncategorized

नवी सांगवी बस थांब्या समोर वळणावर रोडला छेदणाऱ्या चौकातील चेंबर धोकादायक स्‍थितीत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि,. ०७ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील नवी सांगवी कडून जुनी सांगवी कडे जाणाऱ्या नवी सांगवी बस थांब्या समोर वळणावर रोडला छेदणाऱ्या चौकातील कॉर्नर वरील चेंबर धोकादायक स्‍थितीत खचले आहे, त्याचे झाकण तुटल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

हे चेंबर खचल्याने तसेच तुटल्याने बाजूंनी मोठा खड्डा पडला आहे, रात्री आपरात्री या ठिकाणी बस थांबा आणि रिक्षा थांबा असल्याने विद्यार्थ्यांची- नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. पायी चालताना एखाद्याचा पाय त्या तुटलेल्या चेंबरमध्ये अडकून अपघात होण्याचा संभव असल्याने महानगरपालिका स्थापत्य विभागाने ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Google Ad

या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणचे काम सुरू आहे, योगायोगाने दोन्हीही रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराला मिळाले आहे, असे असताना रस्त्याच्या बाजूला असणारे धोकादायक चेंबरचे तुटलेले झाकण ना ठेकेदाराला दिसत ना मनपाच्या अधिकाऱ्यांना दिसत, त्यामुळे नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय काम होत नाही हा अनुभव आहे.

वळण असलयाने व आजूबाजूला पावसाच्या पाण्याचे खड्डे आणि गवत असल्याने रस्‍त्‍यावरून वाहनचालकांना खड्डा चुकवून पुढे जावे लागत आहे. त्‍यामुळे मागच्या वाहनचालकांची फसगत होते. वळणावरच खड्डा असल्‍याने अपघात होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. येथील नागरिकांनी लोखंडी बॅरिकेट आडवे टाकून खड्डा झाकला होता, त्यावर झाडाच्या फांद्याही टाकल्या होत्या, तेही काढण्यात आले; तरी पालिकेने तातडीने याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून आणि नागरिकांच्या कडून करण्यात येत आहे. याची महानगरपालिकेच्या अभियंत्याने दखल घ्यावी.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!