Google Ad
Uncategorized

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार – सर्व शक्तीकेंद्र, बूथनिहाय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र 14 न्यूज (दि.३१ जुलै) : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (दि.३० जुलै) उत्साहात झाला. शहरातील शक्तीकेंद्र आणि मंडलनिहाय या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.  

सांगवी येथे झालेल्या ‘मन की बात’ थेट प्रक्षेपण कार्यक्रमात शहराध्यक्ष शंकर जगताप सहभागी झाले.  तसेच, या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची ‘टिफीन बैठक’ ही झाली.  आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे, कल्याणकारी योजना आणि ऐतिहासिक निर्णयांचे महत्त्व शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याबाबत पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

रावेत- किवळे येथे झालेल्या ‘मन की बात’ हा  कार्यक्रमात सचिन राऊत, बाळासाहेब ओव्हाळ, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, योगेश चिंचवडे, मधुकर बच्चे, प्रशांत अगज्ञान, तानाजी बारणे, अमोल बागुल, सन्नी बारणे, अभिषेक बारणे, संकेत चोंधे, संदीप कस्पटे, विनायक गायकवाड, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, गोपाळ माळेकर, सागर आंगोळकर, शशिकांत कदम, उषाताई मुंढे, राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, जवाहर ढोरे तसेच सर्व शक्तीकेंद्र आणि बुथस्तरावर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

तीर्थक्षेत्र विकासाला गती आणि रोजगार निर्मिती…
अंमली पदार्थांच्या समस्येचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पंतप्रधान यांनी केले. ‘नशा मुक्त भारत अभियान’च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये व्यसनमुक्ती मोहीम राबवण्याबाबत आम्ही पुढाकार घेण्याचा संकल्प केला आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’च्या दरम्यान निर्माण झालेल्या ६० हजाराहून जास्त अमृत सरोवरांच्या परिसराची शान वाढली. या प्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील नैसर्गिक तलाव पुनरुज्जीवन मोहीम हाती घेता येणार आहे. अयोध्या, मथुरा, उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वेगाने वाढत आहे. यातून लाखो गरीब लोकांना रोजगार मिळू लागला आहे. असेच, पिंपरी-चिंचवड शहरातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक यासह तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देणे आणि रोजगार निर्मितीबाबत सकारात्मक भूमिका घेता येणार आहे, असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले.

हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी ‘मेरी माती मेरा देश अभियान’ – ‘माझी माती माझा देश’ ही मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमे अंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड हे क्रांतीवीर चापेकर बंधुंचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरातही  ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबवण्याचा संकल्प आहे. त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी आणि भाजपा परिवारासोबत चर्चा करुन सकारात्मक पुढाकार घेणार आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!