महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे. याबद्दलची महत्वाची बातमी समोर येत असून याविरोधात सुप्रिम कोर्टातही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
सीआर जया सुकीन यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याकरता लोकसभा सचिवालयाला दिशा, निरीक्षण किंवा सूचना देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. १८ मे रोजी लोकसभेच्या महासचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या संसदेचे उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले आहे, असे या याचिकेत नमूद केले आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना आमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे.
या पक्षांनी दर्शविला विरोध…
दरम्यान, काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, NCP, सीपीआय(एम) यांचा समावेश आहे. ), RJD, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) या पक्षांनी कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.
सुप्रिम कोर्टात याचिका दाखल…
याबाबत अधिक माहिती अशी की, संसदेच्या नव्या इमारतीचं २८ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्याआधीच विरोधकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. आता हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावं, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.